शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

ओखी वादळ गुजरातच्या दिशेने, नेत्यांच्या सभा रद्द, निवडणूक आयोग चिंतित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2017 11:00 PM

तामिळनाडू आणि केरळमध्ये हाहाकार माजवल्यानंतर कोकण आणि गोवा असा प्रवास करत ओखी हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकले आहे. तसेच या वादळामुळे निवडणूक आयोगाची चिंतासुद्धा वाढली आहे.

अहमदाबाद - तामिळनाडू आणि केरळमध्ये हाहाकार माजवल्यानंतर कोकण आणि गोवा असा प्रवास करत ओखी हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकले आहे. ओखी वादळामुळे समुद्राला उधाण आले असून, वादळी वारे आणि पावसामुळे काँग्रेस आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या प्रचार सभा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच या वादळामुळे निवडणूक आयोगाची चिंतासुद्धा वाढली असून, पहिल्या फेरीतील मतदानाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला आहे.  ओखी चक्रिवादळामुळे गुजरातमधील निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याविषयी निवडणूक आयोगासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने पहिल्या फेरीतील मतदानाच्या तयारीचा प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे. तसेच राज्य निवडणूक आयुक्तांना ओखी वादळाचा प्रभाव विचारात घेऊन निवडणुकीसाठी पर्यायी योजना तयार ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असून, पहिल्या टप्प्यातील मतदान 9 डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 14 डिसेंबरला होणार आहे. तर मतमोजणी 18 डिसेंबर रोजी होईल.  अरबी समुद्रात निर्माण झालेले ओखी चक्रीवादळ ताशी 21 किलोमीटर या वेगाने गुजरातकडे सरकल्यामुळे मुंबईवरचा धोका टळला आहे. चक्रीवादळाचा विपरित परिणामामुळे मंगळवारी दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरांत पडलेल्या पावसामुळे मुंबईचा वेग संथ झाला होता. चक्रीवादळासह पावसामुळे मंगळवारी मुंबईतल्या शाळा बंद ठेवण्यात आल्या असतानाच उर्वरित दैनंदिन व्यवहारही धीम्या गतीने सुरू होते. मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूकही काही अंशी धीम्या गतीने सुरू असतानाच मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकलही स्लो ट्रॅकवर आली होती. ओखी चक्रीवादळाचा मुंबईला प्रत्यक्ष फटका बसला नसला तरी हवामान खात्याने दिलेल्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सर्वच आपत्कालीन यंत्रणा सतर्क असल्याने पाऊस वगळता सुदैवाने मुंबईकरांना वादळाला सामोरे जावे लागले नाही. दरम्यान, समुद्रात मुंबईपासून दोनशे किलोमीटर अंतरावर घोंगावत असलेले ओखी चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेन सरकले आहे. केरळ आणि तामिळनाडूचे अतोनात नुकसान करणारे ओखी चक्रीवादळ वा-याच्या वेगाने गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातकडे सरकत होते. वादळ जसजसे वेगाने पुढे सरकत होते; तसतसे वा-याचा वेगही काही अंशी कमी होत होता. गोवा आणि महाराष्ट्राच्या किना-यापर्यंत येईस्तोवर वादळाचा वेग ताशी एकवीस किलोमीटर एवढा झाला होता. चक्रीवादळाचा विपरित परिणाम म्हणून राज्यासह मुंबईत पाऊस पडेल, अशी शक्यताही भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली होती. त्यानुसार, सोमवारी दिवसभर मुंबईतले वातावरण ढगाळ राहिले. आणि सायंकाळी सहानंतर सुरु झालेल्या पावसाने आपला मारा मंगळवारी दिवसभर कायम ठेवला. 

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Electionनिवडणूक