शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

तेलकंपन्यांची भारतामध्ये वर्षभरात 8 लाख 94 हजार 40 कोटींची उलाढाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 15:14 IST

इंडियन ऑईल कंपनी, भारत पेट्रोलियम कंपनी आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी या तीन तेलकंपन्यांनी 2016-17 या वर्षभरामध्ये 8,94,040 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. तर कर वजा करुन या कंपन्यांनी एकत्रित 33,354 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे.

ठळक मुद्दे गेल्या वर्षी कर वगळून या तिन्ही कंपन्यांचा नफा 21,694 कोटी तर 2014-15 या वर्षात या कंपन्यांनी कर वगळून 13,091 कोटी रुपयांचा नफा मिळवल्याचे दिसून येते.

मुंबई- इंडियन ऑईल कंपनी, भारत पेट्रोलियम कंपनी आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी या तीन तेलकंपन्यांनी 2016-17 या वर्षभरामध्ये 8,94,040 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. तर कर वजा करुन या कंपन्यांनी एकत्रित 33,354 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. पुणेस्थित माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी मागवलेल्या माहितीमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ही आकडेवारी दिली आहे.या तिन्ही कंपन्यांमध्ये 2016-17 या वर्षभरात इंडियन ऑइल कंपनीची उलाढाल सर्वात जास्त आहे. या कंपनीने 4 लाख 38 हजार 692 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. त्यापाठोपाठ भारत पेट्रोलियम कंपनीने 2,41,859 कोटींचा व्यवसाय केला असून भारत पेट्रोलियमने 2,13,489 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. या तिन्ही कंपन्यांची 2015-16 या वर्षी 7लाख 11 हजार सातशे कोटींची उलाढाल होती. त्याआधीच्या वर्षी 8 लाख 80 हजार 675 कोटी रुपयांची उलाढाल या तिन्ही कंपन्यांनी केली होती. 2019-17 या वर्षभरात इंडियन ऑइल कंपनीने कर वजा करुन 19,106 कोटी रुपये नफा मिळवला आहे तर हिंदुस्थान पेट्रोलियमने 6,209 कोटी आणि भारत पेट्रोलियमने 8,039 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे.  म्हणजेच कर वगळून या तिन्ही कंपन्यांनी या वर्षभरात 33,354 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. गेल्या वर्षी कर वगळून या तिन्ही कंपन्यांचा नफा 21,694 कोटी तर 2014-15 या वर्षात या कंपन्यांनी कर वगळून 13,091 कोटी रुपयांचा नफा मिळवल्याचे दिसून येते. याचाच अर्थ या कंपन्यांचा नफ्याचा आलेख वेगाने वाढत आहे. 19 ऑक्टोबर 2014 पासून पेट्रोलियम उत्पादनाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्या पदार्थांच्या किंमतीवर ठरवल्या जात आहे. या किंमती ठरवण्याचे निर्णय ऑइल मार्केटिंग कंपन्यांद्वारे घेतले जातात.कर वजा जाता या तिन्ही कंपन्यांनी या 2014 ते 2017 या तीन वर्षांमध्ये 65 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवलेला आहे. या कंपन्यांनी आपल्या नफ्याचा वापर सामान्य ग्राहकांना देण्यासाठी करावा, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधनांचे दर कमी करण्यासाठी या कंपन्यांवर दबाव आणला पाहिजे असे मत माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :IndiaभारतPetrol Pumpपेट्रोल पंप