अरेच्चा! राजधानीतला रस्ता हरवला, शोधून देणा-याला 10 हजार बक्षीस
By Admin | Updated: April 17, 2017 18:31 IST2017-04-17T18:31:15+5:302017-04-17T18:31:15+5:30
बॉलिवूडचा सिनेमा “वेलडन अब्बा” सोबत मिळती जुळती घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. येथील एक रस्ता हरवला आहे.

अरेच्चा! राजधानीतला रस्ता हरवला, शोधून देणा-याला 10 हजार बक्षीस
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17- बॉलिवूडचा सिनेमा “वेलडन अब्बा” सोबत मिळती जुळती घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. येथील एक रस्ता हरवला आहे. “वेलडन अब्बा” सिनेमात हरवलेल्या विहिरीची पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. ही विहीर जरी गायब होती तरी कागदावर विहीर दाखवण्यात येत होती. अशाच प्रकारे दक्षिण दिल्लीतील एक रस्ता गेल्या 3 वर्षांपासून गायब आहे.
याबाबत दक्षिण दिल्लीच्या रहिवाशांनी सीआर पार्क पोलीस स्थानकात एक तक्रार नोंदवली आहे. 2014 पासून हा रस्ता गायब आहे. कालकाजी पोलीस स्थानकात यासंबंधी आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. येथील रहिवाशांनी न्यायालयात सादर केलेल्या नकाशात रस्ता दाखवण्यात आला आहे. मात्र, तो केवळ कागदावरच आहे. जवळपास 1.5 किमी लांब हा रस्ता जवळपास गेल्या तीन वर्षांपासून गायब आहे. सध्या त्या रस्त्यावर एक सरकारी शाळा आणि डीडीए कॉलोनीचं अस्तित्व आहे.
रस्ता शोधून देणा-यास 10 हजार रूपयांच बक्षीस दिलं जाईल अशी घोषणा येथील रहिवाशांनी केली आहे.