अरेच्चा ! केजरीवालांनी मोदींवर उधळली स्तुतिसुमनं

By Admin | Updated: October 3, 2016 21:19 IST2016-10-03T21:08:29+5:302016-10-03T21:19:34+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींना नेहमीच टीकेचे लक्ष्य करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चक्क नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत.

Oh! Kejriwal laughed at Modi | अरेच्चा ! केजरीवालांनी मोदींवर उधळली स्तुतिसुमनं

अरेच्चा ! केजरीवालांनी मोदींवर उधळली स्तुतिसुमनं

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - पंतप्रधान नरेंद्र मोदींना नेहमीच टीकेचे लक्ष्य करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चक्क नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर अरविंद केजरीवालांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून मोदींची प्रशंसा केली आहे. ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझ्यात 100 मुद्द्यांवरून मतभेद असतील. मात्र पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर कारवाई करण्याची इच्छाशक्ती दाखवली आहे. त्यासाठी मी त्यांना सलाम करतो", असे केजरीवाल म्हणाले आहेत.

केजरीवाल पुढे म्हणाले, सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. पाकिस्तान आता घाणेरडे राजकारण करत असून, आंतरराष्ट्रीय मीडियाची खोटं बोलून दिशाभूल करतो आहे. आंतरराष्ट्रीय पत्रकारांना सीमेवर घेऊन जाऊन भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राइन झालंच नसल्याचा दावा करत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केल्याचा दावा पाकिस्तान मान्य करायला तयार नाही.

पाकिस्तानचं लष्कर पत्रकारांच्या एक गटाला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर नेऊन पाकिस्तानच्या सीमेवरील परिस्थितीची अवगत करून दिलं आहे. पाकिस्तानच्या सीमेअंतर्गत कोणत्याही प्रकारची कारवाई करणं अशक्य असल्याचं पाकिस्तान लष्करानं सांगितलं आहे, असंही केजरीवाल म्हणाले आहेत.

Web Title: Oh! Kejriwal laughed at Modi