अरे बापरे ! 6 वर्षात 300 बाईक्स चोरल्या

By Admin | Updated: June 6, 2016 16:26 IST2016-06-06T16:23:58+5:302016-06-06T16:26:31+5:30

पोलिसांनी अशा एका दुचाकी चोराला अटक केली आहे ज्याने 6 वर्षांमध्ये तब्ब्ल 300 बाईक्स चोरल्या आहेत

Oh dear! Thieves 300 bikes in 6 years | अरे बापरे ! 6 वर्षात 300 बाईक्स चोरल्या

अरे बापरे ! 6 वर्षात 300 बाईक्स चोरल्या

>ऑनलाइन लोकमत - 
अलाहाबाद, दि. 06 - पोलिसांनी अशा एका दुचाकी चोराला अटक केली आहे ज्याने 6 वर्षांमध्ये तब्ब्ल 300 बाईक्स चोरल्या आहेत. पोलिसांनादेखील हा आकडा ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला. आरोपीचं नाव रमेश पटेल असून त्याला विधायक या नावाने ओळखलं जात. पोलिसांनी करछनामधील त्याच्या घरुन त्याला अटक केली आहे. 
 
इतकी वर्ष बाईक्स चोरी करुनदेखील अजूनपर्यंत तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. अखेर पोलिसांनी त्याला अटक करुन चौकशी केली असताना 300 बाईक्स चोरल्याची माहिती मिळाली आहे. रमेश पटेलला पोलिसांनी अटक केल्याच्या काही तासातच त्याने 33 बाईक्स पोलिसांना परत केल्या. रमेश पटेल एकटा हे काम करत नसून त्याची गँग आहे. खोटी कागदपत्रं बनवण्यात या गँगचा हातखंडा आहे. चोरल्यानंतर खोटी कागदपत्र बनवून या गाड्या बाजारात विकल्या जात. 
 
रमेश पटेल करछानामधील दुहेरी हत्याकांडातील आरोपीदेखील आहे. आत्तापर्यत सहा वेळा तो जेलमध्ये जाऊन आला आहे. जेलमध्ये त्यांचं वागणं पाहून इतर कैद्यांनी त्याला विधायक हे नाव दिलं होतं. 
 

Web Title: Oh dear! Thieves 300 bikes in 6 years