अरे बापरे ! बलात्कार पीडितेच्या बाळाचा 25 हजारात लिलाव

By Admin | Updated: October 18, 2016 12:32 IST2016-10-18T12:21:27+5:302016-10-18T12:32:14+5:30

तरुणीवर बलात्कार करुन तिला गरोदर करणा-या नराधमाने तिच्याच पोटी जन्माला आलेल्या बाळाचा लिलाव केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

Oh dear! Auction of rape victim's baby in 25 thousand | अरे बापरे ! बलात्कार पीडितेच्या बाळाचा 25 हजारात लिलाव

अरे बापरे ! बलात्कार पीडितेच्या बाळाचा 25 हजारात लिलाव

>ऑनलाइन लोकमत
बरेली, दि. 18 - तरुणीवर बलात्कार करुन तिला गरोदर करणा-या नराधमाने तिच्याच पोटी जन्माला आलेल्या बाळाचा लिलाव केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजातील लोकांनी दबाव टाकल्यानंतर या आरोपी तरुणाने पीडित तरुणीशी लग्न केलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला होता. आरोपी पतीने मुलं नसलेल्या एका दांपत्याला 25 हजारामध्ये हे मुल विकलं. तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 
 
'तरुणीने केलेले आरोप गंभीर असून महिला अधिकारी या प्रकरणाचा तपास करेल यासाठी लक्ष घालत आहोत. सर्व बाबींचा तपास करण्यात येईल,' अशी माहिती पोलीस उपमहानिरीक्षक आशुतोष कुमार यांनी दिली आहे.
 
'2013 मध्ये मी शावेजच्या संपर्कात आली होती. त्याचा भरतकामाचा व्यवसाय होता, मी त्याच्याकडे कामाला होती. तो अनेकदा माझ्या घरी येत असे. लग्नाची शाश्वती देऊन त्याने माझ्याशी शरिरसंबंध ठेवलं. पण जेव्हा मी गरोदर झाली तेव्हा त्याने हात झटकले आणि धमकी देण्यास सुरुवात केली,' अशी माहिती पीडित तरुणीने दिली आहे. 
 
'नातेवाईकांनी दबाव टाकल्यानंतर शावेज लग्नासाठी तयार झाला. पण त्यानंतर त्याने जन्माला आलेल्या मुलीला विकूनच टाकलं. त्याने घटस्फोट दिला आणि एका विवाहित व्यक्तीशी लग्न करण्याची जबरदस्ती करु लागला. पण मी कशीबशी माझी सुटका करुन घेतली.' असं पीडित तरुणीने सांगितलं आहे. 
 
तरुणीने अखेर प्रेमनगर पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली. पोलीस कारवाईच्या भीतीने तरुणाने आणि त्याच्या कुटुंबाने पोलिसांसमोर पुन्हा त्रास न देण्याची कबुली देत अट मान्य केली. पण जेव्हा पोलिसांनी अंतिम अहवाल सादर केला तेव्हा त्यांनी आपले शब्द फिरवत पुन्हा तरुणीची फसवणूक केली. यानंतर तरुणीने पोलीस उपमहानिरीक्षकांकडे धाव घेत मदत मागितली. 
 
'मी गेले तीन वर्ष त्रास सहन करत आहे. शावेज आणि त्याच्या कुटुंबियांना शिक्षा व्हावी आणि माझं बाळ मला परत मिळावं यासाठी मी लढणार असल्याचं,' तरुणीने सांगितलं आहे. 
 

Web Title: Oh dear! Auction of rape victim's baby in 25 thousand