चित्रपट महामंडळ पदाधिकार्यांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट
By Admin | Updated: September 20, 2016 01:19 IST2016-09-19T23:58:01+5:302016-09-20T01:19:38+5:30
नाशिक : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची विशेष सर्वसाधारण सभा कोल्हापूर येथे नुकतीच पार पडली. याप्रसंगी घटनादुरुस्तीच्या बाबतीत सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात आला. तसेच रणजित ऊर्फ बाळासाहेब जाधव यांनी सभासदांच्या अडचणींचे निराकरण केले.

चित्रपट महामंडळ पदाधिकार्यांनी घेतली पोलीस महासंचालकांची भेट
नाशिक : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची विशेष सर्वसाधारण सभा कोल्हापूर येथे नुकतीच पार पडली. याप्रसंगी घटनादुरुस्तीच्या बाबतीत सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात आला. तसेच रणजित ऊर्फ बाळासाहेब जाधव यांनी सभासदांच्या अडचणींचे निराकरण केले.
याप्रसंगी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, उपाध्यक्ष वर्षा उसगावकर यांनी घटनांमधील दुरुस्ती व त्यावर उपाय यासंदर्भात आपली मते मांडली व माहिती दिली.
चित्रपट महामंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. नाशिक विभागाचे अध्यक्ष रवि बारटक्के, बाळासाहेब मढवई यांनी कोल्हापूरचे पोलीस महासंचालक विश्वास नागरे-पाटील यांची भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ व पत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट महामंडळास चित्रीकरणासाठी सहकार्य करू, असे आश्वासन दिले.
फोटो कॅप्शन
कोल्हापूरचे पोलीस महासंचालक विश्वास नागरे-पाटील यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान करताना चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले. समवेत उपाध्यक्ष वर्षा उसगावकर, नाशिकचे अध्यक्ष रवि बारटक्के, बाळासाहेब मढवई आदि.