शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
11
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
12
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
13
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
14
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
15
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
16
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
17
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
18
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
19
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
20
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याची खेचली साडी, दिल्लीच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 14:17 IST

दिल्लीमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याची साडी खेचून तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देलैंगिक जबरदस्तीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे.हॉटेलचा सुरक्षा व्यवस्थापक पवन दहीया मागच्या अनेक दिवसांपासून या महिलेवर शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता.

नवी दिल्ली, दि. 18 - दिल्लीमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याची साडी खेचून तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लैंगिक जबरदस्तीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. महत्वाचं म्हणजे ज्या अधिकाऱ्याने हे कृत्य केले त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी पीडित महिलेने तक्रार केली म्हणून तिलाच नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. 

ही घटना 29 जुलैला दिल्लीच्या प्राईड प्लाजा हॉटेलमध्ये घडली. 33 वर्षीय पीडित महिला मागच्या दोनवर्षांपासून हॉटेलच्या गेस्ट रिलेशन सेक्शनमध्ये नोकरी करत होती. हॉटेलचा सुरक्षा व्यवस्थापक पवन दहीया मागच्या अनेक दिवसांपासून या महिलेवर शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. 29 जुलैला त्याने पीडित महिलेला त्याच्या रुममध्ये बोलवले तिथे त्याने साडी खेचून महिलेला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान पवनच्या रुममध्ये एक व्यक्ती आली हीच संधी साधून पीडित महिला तिथून बाहेर पडली. 

आणखी वाचा चिनी मोबाइल कंपन्यांची डाटाचोरी रोखण्यासाठी मोदी सरकारने आखला प्लानभारताला पाठिंबा देऊन जपानची चीनला सणसणीत चपराक

ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी पीडित महिलेचा वाढदिवस होता. महिला तिची दोनची शिफ्ट संपवून घरी जायला निघाली तेव्हा पवनने तिचा पाठलाग करुन दोनवेळा तिला जबरदस्ती गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेने एचआर विभागाकडे घडलेल्या घटनेची तक्रार केली. पण कुठलीही कारवाई झाली नाही. 

अखेर नव-याच्या सल्ल्यावरुन तिने एक ऑगस्टला पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला. पीडित महिलेने घटनेचे सीसीटीव्ही फुटेज माध्यमांना दिल्यानंतर दोन आठवडयांनी तिला हॉटेलकडून नोकरीवरुन कमी करण्यात आल्याचे पत्र मिळाले. ज्या सहका-याने पीडित महिलेला सीसीटीव्ही फुटेज मिळवून द्यायला मदत केली त्याला सुद्धा नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. दहीयाने अनेकदा माझ्यावर शरीरसंबंधासाठी दबाव टाकला असा या महिलेने आरोप केला. 

बलात्काराला विरोध करणा-या तरुणीला विवस्त्र अवस्थेत चौथ्या मजल्यावरुन फेकलेमागच्या आठवडयात दिल्लीमध्ये एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याच्या प्रयत्नात तिला विवस्त्र अवस्थेत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन खाली फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणातील मुख्य  आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :New Delhiनवी दिल्ली