कार्यालये ओस
By Admin | Updated: September 26, 2014 00:19 IST2014-09-26T00:19:15+5:302014-09-26T00:19:15+5:30
निवडणूकीच्या लगबगीसाठी तहसील कार्यालयातील कर्मचारी, बांधकाम विभागाचे अधिकारी भूमीअभिलेख अधिका-यांबरोबरच कृषी कर्मचारीही

कार्यालये ओस
भातसानगर : निवडणूकीच्या लगबगीसाठी तहसील कार्यालयातील कर्मचारी, बांधकाम विभागाचे अधिकारी भूमीअभिलेख अधिकाऱ्यांबरोबरच कृषी कर्मचारीही एक महिना निवडणुकीच्या कामात गुंतवल्याने सर्वच महत्त्वपूर्ण कामे करण्यासाठी अधिकारीच नसल्याने कार्यालये ओस पडली आहेत. तर शेतीच्या औजारांनाही आचार संहितेने ग्रासले की काय? अशी विचारणा होत आहे. शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना महत्वपूर्ण असणारे तहसिल कार्यालय, भूमीअभिलेख कार्यालयाबरोबर कृषी कार्यालय मात्र याच कार्यालयीन अधिकाऱ्यांना निवडणूको होईपर्यंत महिन्याभराची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये पोलींग नुसार मतदान मशीन कर्मचारी सुरक्षा व्यवस्था इमारत व्यवस्था विज त्यानुसार बॅलेट पेपर व्यवस्था आदी गोष्टींची पूर्तता करण्यासाठी सर्व महत्वपूर्ण अधिकारी व कर्मचारी वनविभाग कार्यालय शहापूर येथे सकाळपासून सायंकाळपर्यंत कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे कार्यालय कमी निवडणूक कार्यालय अधिक अशी स्थिती आहे. (वार्ताहर)