हवेली पाडणाऱ्या मालकावर गुन्हा

By Admin | Updated: January 19, 2016 02:57 IST2016-01-19T02:57:59+5:302016-01-19T02:57:59+5:30

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते राज कपूर यांच्या कुटुंबियांची हवेली पाडण्यास सुरुवात करणाऱ्या इमारत मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Offense of owner of the mansion | हवेली पाडणाऱ्या मालकावर गुन्हा

हवेली पाडणाऱ्या मालकावर गुन्हा

पेशावर : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते राज कपूर यांच्या कुटुंबियांची हवेली पाडण्यास सुरुवात करणाऱ्या इमारत मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पुरातत्व विभागाने स्थानिक न्यायालयातून या पाडापाडीला स्थगिती मिळविली आहे.
पुरातत्व, संग्रहालय महासंचालक विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार दाखल केल्यानंतर या हवेलीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिक मॉल वा तत्सम वास्तू उभारण्यासाठी ही हवेली पाडण्याचे काम सुरू झाले होते.

 

Web Title: Offense of owner of the mansion