आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:14+5:302015-01-02T00:21:14+5:30

भिवंडी - मुलीची छेड काढल्याचा संशय घेऊन केलेल्या मारहाणीतून मुलाने स्वत:ला पेटवून घेतले. दीपक सावंत असे त्याचे नाव आहे. त्याला दोन महिन्यांपूर्वी कोन गावात मारहाण करण्यात आली होती. मारहाण करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी बुधवारी मुलाच्या आईने कोन पोलीस ठाण्यात लवेश राठोड, कमलाकर नाईक, संतोष व अल्पीताचे मामा या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Offense to motivation for suicide | आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

वंडी - मुलीची छेड काढल्याचा संशय घेऊन केलेल्या मारहाणीतून मुलाने स्वत:ला पेटवून घेतले. दीपक सावंत असे त्याचे नाव आहे. त्याला दोन महिन्यांपूर्वी कोन गावात मारहाण करण्यात आली होती. मारहाण करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी बुधवारी मुलाच्या आईने कोन पोलीस ठाण्यात लवेश राठोड, कमलाकर नाईक, संतोष व अल्पीताचे मामा या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दीपकने अल्पिता नावाच्या मुलीची छेड काढल्याचा संशय घेऊन त्यास अष्टविनायक मंदिरासमोरील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या टेरेसवर नेऊन मारहाण करण्यात आली होती. त्याला जीवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली होती. त्या भीतीपोटी दीपक याने रात्री ११च्या सुमारास रस्त्यातच अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला दवाखान्यात नेले असता त्याचा मृत्यू झाला. त्याच्याआत्महत्येस कारणीभूत असल्याचा आरोप करून मारहाण करणारे लवेश राठोड, कमलाकर नाईक, संतोष व अल्पीताचे मामा या चौघांच्या विरोधात दीपकची आई मिना प्रभाकर सावंत यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Offense to motivation for suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.