हैदराबाद : नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार शब्बीर अली यांच्यावर हल्ल्याप्रकरणी एमआयएम प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तेलंगणा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अली यांनी ओवेसी आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मीर चौक पोलिसांनी ओवेसी आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस चौकशी सुरू असून, तपासाअंती योग्य कारवाई केली जाईल. ओवेसींच्या नेतृत्वातील एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप टीपीसीसीचे अध्यक्ष उत्तमकुमार रेड्डी आणि अली यांनी केला आहे. (वृत्तसंस्था)
हल्ला केल्याप्रकरणी ओवेसींविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: February 4, 2016 02:57 IST