भारताचा चुकीचा नकाशा दाखविणा-या गूगलविरूध्द गुन्हा

By Admin | Updated: December 18, 2014 17:21 IST2014-12-18T17:21:07+5:302014-12-18T17:21:07+5:30

माहिती तंत्रज्ञानासंबंधी महत्वपूर्ण माहिती उपल्बध करुन देणा-या गूगलने भारताचा चुकीचा नकाशा दाखविल्याने गूगलविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

Offense against Google showing wrong map of India | भारताचा चुकीचा नकाशा दाखविणा-या गूगलविरूध्द गुन्हा

भारताचा चुकीचा नकाशा दाखविणा-या गूगलविरूध्द गुन्हा

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १८ - माहिती तंत्रज्ञानासंबंधी महत्वपूर्ण माहिती उपल्बध करुन देणा-या गूगलने भारताचा चुकीचा नकाशा दाखविल्याने गूगलविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. देहराडूनमधील डालनवाला पोलीस ठाण्यात आयटी एक्ट अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्याचे अनिल कुमार जोशी यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय नकाशामध्ये भारताच्या अनेक सीमा या इतर देशांच्या नकाशामध्ये दाखविण्याचा प्रताप गूगलने केला आहे. भारतीय सर्वेक्षण विभागाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी गूगलविरुध्द गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती. भारतीय सर्वेक्षण विभागाच्या तक्रारीनंतर देहराडूनमध्ये गूगलविरुध्द आयटी एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

Web Title: Offense against Google showing wrong map of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.