शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 11:04 IST

ओडिशात लैगिंक अत्याचार करणाऱ्या एका व्यक्तीला काही महिलांनी मिळून संपवल्याची घटना समोर आली आहे.

Odisha Crime: ओडिशात अत्याचार पीडित महिलांनी आरोपीला शिक्षा देऊन स्वतःच न्याय मिळवून घेतल्याची घटना समोर आली आहे. ओडिशाच्या गजपती जिल्ह्यात लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका ६० वर्षीय व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह जाळून टाकण्यात आला. पीडित महिलांनी मिळून हे कृत्य केल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. या प्रकरणात आठ महिलांसह एकूण १० जणांना अटक करण्यात आली आहे. मृताच्या कुटुंबीयांनी को बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. तपासादरम्यान हा सगळा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी सांगितले की, आम्हाला त्या माणसाची हत्या करण्यात आली होती आणि नंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला अशी माहिती मिळाली होती. गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलाजवळील एका टेकडीवरून पोलिसांनी जळालेली हाडे आणि राख जप्त केली. याप्रकरणी गावातील एका वॉर्ड सदस्यासह दहा जणांना अटक करण्यात आली आहे.

हा सगळा धक्कादायक प्रकार ३ जूनच्या रात्री घडला. त्यानंतर सहा दिवसांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. मृत व्यक्तीने गावातील एका ५२ वर्षीय विधवेवर बलात्कार केल्याचा आरोप होता. याच व्यक्तीने आणखी काही महिलांवरही लैगिंक अत्याचार केले होते. त्यामुळे त्या सर्व महिलांनी एक येत अत्याचार करणाऱ्याला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांनी बैठक घेतली आणि त्याला ठार मारण्याचा ठरवले असं पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर सर्व पीडित महिला त्या व्यक्तीच्या घरी गेल्या. तिथे तो झोपला होता. त्यावेळी ५२ वर्षीय विधवेने इतरांच्या मदतीने अत्याचार करणाऱ्याची हत्या केली. यावेळी दोन पुरुषांनीही महिलांना मदत केली. अटक केलेल्या सहा महिलांनी सांगितले की मृत झालेल्या व्यक्तीने त्यांचे लैंगिक शोषण केले होते आणि त्याला शिक्षा देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले. पीडित महिलांनी त्या पुरूषाविरुद्ध (मृत) पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही किंवा त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारची मदत मागितली नाही, अशी माहिती गजपतीचे पोलीस अधीक्षक जतिंद्र कुमार यांनी दिली.

टॅग्स :OdishaओदिशाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस