शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील तिन्ही रेल्वेच्या चालकांचे काय झाले? समोर आली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 11:27 IST

बहनगा बाजार स्थानकावर या एक्सप्रेसला थांबा नाही. अशा स्थितीत दोन्ही गाड्यांचा वेग जास्त होता.

बालासोर - ओडिशाच्या तिहेरी ट्रेन अपघाताने देशात हळहळ व्यक्त होत आहे. या भीषण दुर्घटनेत २८० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला तर ११०० प्रवासी जखमी झाले. या अपघाताचे कारण सिग्नल यंत्रणेतील त्रूट असल्याचे बोलले जात आहे. सध्या याचा तपास सुरू आहे. दुर्घटनेच्या ६२ तासांनंतर लोकांना या ट्रेनच्या ड्रायव्हरचे काय झाले हा प्रश्न पडला आहे. यात २ ट्रेनचे लोको पायलट आणि गार्ड जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी ओडिशाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. तर मालगाडीच्या इंजिन चालक, गार्ड अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. 

दक्षिण पूर्व रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी राजेश कुमार यांनी सांगितले की, कोरोमंडल एक्सप्रेसचे लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट आणि गार्डसह बंगळुरू हावडा एक्सप्रेसचे लोको पायलट, गार्ड यांचा जखमींच्या यादीत समावेश आहे. या सर्व जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ३ रेल्वे एकमेकांना धडकल्यानंतर रेल्वे बोर्डाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. लोको पायलटच्या हवाल्याने सिग्नल यंत्रणेतील गोंधळामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले आहे. 

सिग्नलमधील बिघाड ठरला अपघाताला जबाबदारकोरोमंडल एक्सप्रेसच्या ड्रायव्हरने सांगितले की, मला ग्रीन सिग्नल मिळाल्याने मी ट्रेन पुढे घेऊन गेलो. तर यशवंतपूर एक्सप्रेसच्या ड्रायव्हरने अपघातापूर्वी अजब-गजब आवाज ऐकायला मिळाला असा दावा केला. या भीषण दुर्घटनेत कोरोमंडल ट्रेनचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. 

कसा झाला अपघात?रेल्वेकडून सांगितले जात आहे की, ट्रेन नंबर १२४८१ कोरोमंडल एक्सप्रेस बहानगा बाजार स्टेशनजवळ मेनलाईनवरून जात होती. त्याचवेळी जी मालगाडी रुळावरून घसरली होती तिला जाऊन कोरोमंडल एक्सप्रेसने धडक दिली. ट्रेनचा वेग खूप जास्त असल्याने कोरोमंडल एक्सप्रेसचे २१ डबे रुळावरून घसरले आणि ३ डबे डाऊन लाइनवर गेले. प्रत्येक रेल्वे स्टेशनला दुसरी ट्रेन पास करण्यासाठी लूप लाइन असते. बहनगा बाजार स्टेशनवर अप आणि डाऊन अशा दोन लूप लाइन आहेत. स्टेशनवरून दुसरी ट्रेन पास करावी लागते तेव्हा कोणतीही ट्रेन लूप लाइनवर उभी केली जाते.

बहनगा बाजार स्थानकावर या एक्सप्रेसला थांबा नाही. अशा स्थितीत दोन्ही गाड्यांचा वेग जास्त होता. बहनगा बाजार स्थानकावरून जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस मालगाडीवर आदळल्याने हा अपघात झाला. दरम्यान, अपघाताच्या वेळी डाऊन मार्गावरून जाणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसचे मागचे दोन डबेही रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसला धडकले. भुवनेश्वर रेल्वे स्थानकापासून सुमारे १७१ किमी आणि खरगपूर रेल्वे स्थानकापासून सुमारे १६६ किमी अंतरावर बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्थानकाजवळ हा अपघात झाला.

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघात