नवी दिल्ली- महाभारतात ज्याप्रमाणे युधिष्ठिरानं द्रौपदीला पणाला लावलं तसाच काहीसा प्रसंग ओडिशात घडला आहे. महिला सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील असतानाही बलात्काराच्या घडना काही थांबत नाही आहेत. ओडिशातल्या बालासोरमध्ये महाभारतातल्या कहाणीची पुनरावृत्ती झाली आहे. बालासोरमध्ये एका व्यक्तीनं जुगारात स्वतःच्या पत्नीलाच पणाला लावलं.ओडिशातल्या या प्रकारामुळे पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासल्याची भावना व्यक्त केली जात आहे. जुगारात तो स्वतःच्या पत्नीला हरवून बसला. त्यानंतर जिंकणा-यानं कथित स्वरूपात त्याच्या पत्नीवर बलात्कार केला. विशेष म्हणजे पतीनं तिला वाचवण्याऐवजी बलात्कार करणा-या नराधमाला मदत केल्याचा आरोपही पीडितेनं केला आहे. बालासोरमध्ये 35 वर्षांच्या महिलेनं बलात्काराची तक्रार नोंदवली आहे. 23 मे रोजी त्या पीडितेबरोबर बलात्काराची घटना घडली असून, आज ती उघडकी आली आहे. आरोपीनं पतीच्या परवानगीनेच बलात्कार केल्याचा आरोप पीडितेनं केला आहे. गाववाल्यांनीही या गोष्टीची खातरजमा केली.पोलीस अधिकारी के. एस. पढी म्हणाले, बालिकूट गावात राहणा-या महिलेनं तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच बलात्कारादरम्यान पतीनं माझं तोंड दाबल्याचंही ती महिला म्हणाली आहे. पतीनं जुगाराच्या व्यसनापायी मला पणाला लावलं आणि हरून बसला. 28 मे रोजी पीडितेनं गावक-यांच्या मदतीनं पतीविरोधात तक्रार केली. आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.
धक्कादायक! जुगारात पत्नीला लावलं पणाला, जिंकणा-यानं केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 13:57 IST