शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

ओडिशा लोकसभा निवडणूक निकाल 2019 : ओडिशात 'बीजेडी' ची विजयाच्या दिशेने वाटचाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 16:25 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून ओडिशात बीजू जनता दलाने आघाडी घेतली आहे. सुरुवातीचा कल पाहता, 21 पैकी 14 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून ओडिशात बीजू जनता दलाने आघाडी घेतली आहे.21 पैकी 14 जागांवर बीजेडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर भाजपा 7 जागांवर पुढे आहे. 146 पैकी 114 जागांचे कल हाती आले असून 89 जागांवर आघाडी घेत बीजू जनता दल मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

भुवनेश्वर - 2014 मध्ये देशात भले मोदी लाट उसळली होती, परंतु ओडिशातील 21 पैकी 20 जागांवर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दलानं आपला झेंडा फडकवला होता. त्यांची ही ताकद लक्षात घेऊन, यावेळी त्यांना 'काँटे की टक्कर' देण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसनं कट्टर तयारी केली होती. मोदींसाठी तर ही लढाई प्रतिष्ठेची आहे. त्यात त्यांना यश येतं, की यावेळीही ओडिशाची जनता बीजू जनता दलालाच साथ देते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. 

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून ओडिशात बीजू जनता दलाने आघाडी घेतली आहे. सुरुवातीचा कल पाहता, 21 पैकी 14 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर भाजपा 7 जागांवर पुढे आहे. ओडिशामध्ये आज विधानसभा निवडणुकांचीही मतमोजणी होत आहे. येथील 146 पैकी 114 जागांचे कल हाती आले असून 89 जागांवर आघाडी घेत बीजू जनता दल मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांच्या तुलनेत ओडिशातून कमी खासदार लोकसभेत जात असले, तरी यावेळी तेच निर्णायक ठरू शकतात, असं जाणकारांनी सूचित केलंय. बीजू जनता दलाने गेल्या निवडणुकीप्रमाणेच मुसंडी मारली आणि इकडे त्रिशंकू निकाल लागला, तर देशाचा नायक ठरवण्यात नवीन पटनायक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अर्थात, आपण कुणासोबत आहोत किंवा कुणासोबत जाऊ, हे त्यांनी अजूनही गुलदस्त्यातच ठेवलं आहे.

'फनी' वादळानंतर मोदी सरकारला 'नवीन' बळ; सत्तेचं गणित होणार सोपं? 

फनी चक्रीवादळानं ओडिशामध्ये हाहाकार उडवला. या चक्रीवादळात ४१ जणांचा मृत्यू झाला असून मोठी वित्तहानीही झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या परिस्थितीची हवाई पाहणी करून १ हजार कोटींची तातडीची मदतही जाहीर केली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, नरेंद्र मोदी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. फनी चक्रीवादळाआधी नागरिकांच्या स्थलांतराचे आणि नंतर मदत आणि पुनर्वसनाचे काम ओडिशा सरकारने उत्तम प्रकारे केल्याचं प्रशस्तीपत्रक नरेंद्र मोदी यांनी नवीन पटनायक यांना दिलं होतं. त्यांच्या या पत्राला पटनायक यांनी उत्तर पाठवलंय आणि त्यात केंद्राचे आभार मानलेत. गरजेच्या वेळी राज्याच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या रणसंग्रामात एकमेकांवर टीकास्त्र सोडणाऱ्या या दोन नेत्यांमधील हे कौतुकाचे बोल भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकतात, असं जाणकारांना वाटतंय. 

 

टॅग्स :Odisha Lok Sabha Election 2019ओडिशा लोकसभा निवडणूक निकाल 2019BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी