शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

३० हजारांची लाच, रंगेहात पकडलेल्या अधिकाऱ्याच्या घरात सापडला नोटांचा डोंगर, मोजून मोजून मशीनही थकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:53 IST

Odisha Bribe Case: भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांकडे बेहिशोबी मालमत्ता, दागदागिने सापडणं आता आपल्यासाठी नवं राहिलेलं नाही. यादरम्यान, ओदिशामधील दक्षता विभागाने खाण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लाचखोरीच्या एका प्रकरणात रंगेहात पकडलं आहे.

भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांकडे बेहिशोबी मालमत्ता, दागदागिने सापडणं आता आपल्यासाठी नवं राहिलेलं नाही. यादरम्यान, ओदिशामधील दक्षता विभागाने खाण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लाचखोरीच्या एका प्रकरणात रंगेहात पकडलं आहे. तसेच या अधिकाऱ्याच्या फ्लॅटमधून चार कोटींपेक्षा अधिक रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. अशा कारवाईत झालेली ही राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रोख रकमेची जप्ती आहे, असेही दक्षता विभागाने सांगितले आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार कटक सर्कलमधीली खाणींचे उप संचालक म्हणून तैनात असलेले देवव्रत मोहंती यांना ओदिशा दक्षता विभागाने आधी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. त्यांच्यावर एक परवानाधारी कोळसा व्यापाऱ्याकडून त्याच्याकडील कोळसा डेपो व्यवस्थित चालवण्यासाठी आणि कोळशाच्या वाहतुकीला परवानगी देण्याच्या बदल्यात पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. ही कारवाई करण्यासाठी मंगळवारी दक्षता विभागाने सापळा रचला आणि मोहंती याला ३० हजार रुपयांची लाच घेताना पकडले. आरोपीकडून लाचेची संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली आहे.

मोहंती याला अटक करण्यात आल्यानंतर सतर्कता अधिकाऱ्यांनी तीन ठिकाणी एकत्रितरीत्या धाड टाकली. त्यात मोहंती याचा भुवनेश्वर येथील फ्लॅट, भद्रक जिल्ह्यातील मथासाही येथील वडिलोपार्जित घर आणि कटक येथील कार्यालयातील दालन याचा समावेश होता. या धाडीदरम्यान, भुवनेश्वर येथील पाटियामधील श्रीविहार नेचर क्रेस्ट अपार्टमेंटमधील त्यांच्या फ्लॅटमधून ४ कोटी रुपयांहून अधिकची रोख  रक्कम जप्त करण्यात आली आहे.

ही रक्कम ट्रॉली बॅग आणि कपाटांमध्ये लपवून ठेवण्यात आली होती. जप्त करण्यात आलेल्या रकमेची मोजणी सुरू असून, मोजणी पूर्ण झाल्यानंतर जप्त केलेल्या रकमेचा अचूक आकडा कळणार आहे. तसेच जप्त करण्यात आलेली रक्कम ही राज्याच्या सतर्कता विभागाने कारवाईत आतापर्यंत जप्त केलेली सर्वात मोठी रक्कम असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय या कारवाईदरम्यान, मोहंती यांच्या आणखीही काही संपत्तीची माहिती समोर आली आहे. त्यात भुवनेश्वरमधील पहला परिसरात असलेलं दुमजली घर आणि सुमारे १३० ग्रॅम सोन्याचाही समावेश आहे. तसेच इतर शोधमोहीम सुरू आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Bribe-taking officer caught; Crores in cash found, machines tire counting.

Web Summary : An Odisha mining official was caught taking a bribe. Raids on his properties revealed over ₹4 crore in cash, the largest seizure in the state's history. He faces charges of demanding money for coal depot operations and transport permissions. Further investigations are ongoing.
टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणOdishaओदिशाCorruptionभ्रष्टाचारCrime Newsगुन्हेगारी