शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

माकडांनी पळवलं 15 दिवसांचं बाळ, विहिरीत सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 13:09 IST

बाळाला मच्छरदाणीच्या आतमध्ये ठेवले होते.

भुवनेश्वर: कटक येथील तलबस्ता गावात रविवारी एक हदयद्रावक घटना घडली. याठिकाणी एका 15 दिवसांच्या बाळाला माकडांनी घरातून पळवून नेले. त्यानंतर जवळच्याच एका विहिरीत या बाळाचा मृतदेह आढळून आला.स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी सहा वाजता माकडांनी घरात झोपलेल्या या बाळाला पळवून नेले होते. यावेळी बाळाला मच्छरदाणीच्या आतमध्ये ठेवले होते. माकडांनी ही मच्छरदाणी दूर करून बाळाला उचलले. तेव्हा बाळाच्या आईने माकडांना बघितले आणि आरडाओरडा करायला सुरूवात केली. मात्र, तोपर्यंत बाळाला घेऊन माकडांनी छपरावर उडी मारली आणि जंगलात पसार झाले. या घटनेनंतर वनाधिकारी आणि स्थानिक लोकांची  तीन पथकं बाळाला शोधण्यासाठी जंगलात गेली होती. परंतु, बाळाचा थांगपत्ता लागला नाही. अखेर रविवारी सकाळी शेजाऱ्यांच्या 50 फूट खोल विहिरीत बाळाचा मृतदेह तरंगताना आढळून आला.मात्र, शेजाऱ्यांनी शनिवारपर्यंत विहिरीत हा मृतदेह नव्हता, असे सांगितले. बाळाला पळवल्याचे समजल्यानंतर आम्ही विहिरीत बघितले होते. तेव्हा आम्हाला विहिरीत काहीच आढळले नाही. आम्ही बहुतेकदा विहिरीवर काहीतरी आच्छादन टाकून ठेवतो, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे बाळ माकडांच्या हातातून निसटून खाली विहिरीत पडले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या परिसरात माकडांचा उच्छाद ही नेहमीची समस्या आहे. याबद्दल स्थानिक गावकऱ्यांनी वनाधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारीही केल्या आहेत. मात्र, त्याची पुरेशी दखल घेतली जात नाही, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवMonkeyमाकडSocial Viralसोशल व्हायरल