शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

ओडिशात पहिल्यांदाच BJP सरकार; मोहन चरण माझी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 19:45 IST

सीएम माझी यांच्यासह दोन उपमुख्यमंत्री आणि 13 मंत्र्यांनीही शपथ घेतली.

Odisha Assembly Election 2024 : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय नोंदवला. या विजयासह भाजपने गेल्या 24 वर्षांपासून राज्यात असलेली बीजू जनता दलाची सत्ता उलथून लावली. 147 जागांपैकी भाजपने 78 जागा मिळवल्या. आज या नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. मोहन चरण माझी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री आणि 13 मंत्र्यांचाही शपथविधी झाला. माझी यांच्या मंत्रिमंडळात 8 कॅबिनेट मंत्री आणि 5 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

नवीन पटनायक 2000 पासून 2024 पर्यंत, म्हणजेच 24 वर्षे 97 दिवस राज्याचे मुख्यमंत्री होते. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच राज्यात भाजपचे सरकार आले आहे. त्यामुळे हा शपथविधी सोहळाही खास होता. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री आणि विविध राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री माझी यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पटनागचे आमदार के.व्ही.सिंग देव आणि निमापारा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच विजयी झालेल्या आमदार प्रवती परिदा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. जनता मैदानावर राज्यपाल रघुबर दास यांनी त्यांना गोपनीयतेची आणि पदाची शपथ दिली.

या दिग्गजांनी उपस्थितीपूर्वेकडील या राज्यात प्रथमच भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त भाजपचे प्रमुख जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, जुआल ओरम, अश्विनी वैष्णव आदी उपस्थित होते. उत्तर प्रदेश, गोवा, राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम, गुजरात, छत्तीसगड आणि उत्तराखंडसह भाजपशासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्रीही उपस्थित होते. ओडिशाचे निवर्तमान मुख्यमंत्री नवीन पटनायकदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

  • मुख्यमंत्री- मोहन चरण माझी
  • उपमुख्यमंत्री- कनकवर्धन सिंह देव
  • उपमुख्यमंत्री- प्रवती परिदा
  • कॅबिनेट मंत्री- सुरेश पुजारी
  • कॅबिनेट मंत्री- रवीनारायण नाईक
  • कॅबिनेट मंत्री- नित्यानंद गोंड
  • कॅबिनेट मंत्री- कृष्ण चंद्र पात्रा
  • कॅबिनेट मंत्री- पृथ्वीराज हरिचंदन महापात्रा
  • कॅबिनेट मंत्री- मुकेश महालिंग
  • कॅबिनेट मंत्री- बिभूती भूषण जेना
  • कॅबिनेट मंत्री- कृष्णचंद्र महापात्रा
  • राज्यमंत्री- गणेश रामसिंह खुंटिया
  • राज्यमंत्री- सूर्यवंशी सूरज
  • राज्यमंत्री- प्रदीप बालसामंता
  • राज्यमंत्री- गोकुळ नंदर मल्लिक
  • राज्यमंत्री - संपद कुमार सेविन
टॅग्स :OdishaओदिशाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी