शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

नवरात्रीनिमित्त गरबा खेळण्यासाठी आलेल्यांचं गोमूत्र शिंपडून करण्यात आलं शुद्धीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 18:30 IST

गरबा खेळण्यासाठी आलेल्या लोकांवर गोमूत्र शिंपडून शुद्धिकरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे

ठळक मुद्देगरबा खेळण्यासाठी आलेल्या लोकांवर गोमूत्र शिंपडून शुद्धिकरण करण्यात आल्याची घटनागुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये आयोजित थनगनाट गरबा महोत्सवात ही घटना घडली बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांचं गोमूत्र शिंपडून आणि नाम ओढून स्वागत करण्यात आलं

अहमदाबाद - गुजरातमध्ये गरबा खेळण्यासाठी आलेल्या लोकांवर गोमूत्र शिंपडून शुद्धिकरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये आयोजित थनगनाट गरबा महोत्सवात ही घटना घडली आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांचं गोमूत्र शिंपडून आणि नाम ओढून स्वागत करण्यात आलं.   

सहभागी झालेल्या लोकांनी सांगितल्यानुसार, शुक्रवारी बजरंग दलाचे अनेक कार्यकर्ता जवळपास 25 मिनिटं कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. हे कार्यकर्त बाहेर थांबले होते. मात्र याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. 

बजरंग दलाचे कार्यकर्ता सुर्यप्रकाश वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही गांधीनगर आणि आसपासच्या परिसरात लव्ह जिहाद विरोधात महिलांना जागरुक करण्यासाठी फिरत आहोत. स्वागतासाठी गोमूत्राचा वापर करणे आणि नाम ओढण्याची परंपरा पुन्हा रुजावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत'. 

गरबा महोत्सवाचे आयोजक संदीप जोशी यांनी सांगितलं आहे की, बजरंग दलाने आधीच आम्हाला यासंबंधी कल्पना दिली होती, आणि यामध्ये काहीही चुकीचं नाही. दुसरीकडे गरब्यात सहभागी झालेल्या साक्षी परमार या तरुणीचं म्हणणं आहे की, आपली परंपरा, संस्कृती गोमूत्राचा वापर शिकवते, आणि मला यामध्ये काहीच त्रास नाही. 

गरबा प्रवेशासाठी आधार कार्ड सक्तीचं करा- हिंदू उत्सव समितीनवरात्र उत्सवादरम्यान होणा-या गरबामध्ये केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा. शिवाय, यासाठी आधार कार्ड दाखवणं बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी हिंदू उत्सव समिती (HUS) नावाच्या संस्थेनं केली होती.  गरबामध्ये अनेकदा हिंदू नसलेली लोकं येतात व ते हिंदू मुलींनी स्वतःकडे आकर्षिक करण्याचा प्रयत्न करतात, असे समितीचे म्हणणे होते. एकूणच गरबामध्ये मुस्लिमांना प्रवेश मिळू नये, यासाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आल्याची बाब संस्थेचं अध्यक्ष कैलास बेगवानी यांनी मान्य केली होती. भोपळमध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत संस्थेनं गरबामध्ये आधार कार्ड सक्ती करण्यात यावी, अशी   मागणी केली होती.   

टॅग्स :Navratriनवरात्रीNavratri 2017नवरात्रौत्सव २०१७GarabaGaraba