स्वराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिवट

By Admin | Updated: December 9, 2015 09:11 IST2015-12-09T08:54:32+5:302015-12-09T09:11:52+5:30

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे पाकिस्तानात आगमन झाल्यानंतर काहीवेळातच त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिवट करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता.

Objectionable tweet about Swaraj | स्वराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिवट

स्वराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिवट

ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. ९ - अफगाणिस्तानवरील हार्ट ऑफ एशिया परिषदेसाठी मंगळवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे पाकिस्तानात आगमन झाल्यानंतर काहीवेळातच त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह टि्वट करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. प्रसिध्द पाकिस्तानी पत्रकार आणि जियो न्यूजचे संपादक हामिद मीर यांच्या टि्वटर अकाउंटवरुन सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याबद्दल हे आक्षेपार्ह टि्वट करण्यात आले होते. 

हामिर मीर यांना याची माहिती मिळताच त्यांनी माफी मागितली आणि आपले टिेवटर अकाउंट हॅक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अन्य पाकिस्तानी पत्रकारांनीही मीर यांचे अकाउंट हॅक झाल्याची माहिती दिली. हामिद मीर यांच्यावर एप्रिल २०१४ मध्ये प्राणघातक हल्ला झाला होता. मात्र त्यातून ते बचावले होते.  

Web Title: Objectionable tweet about Swaraj