शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

पोखरणमध्ये विमानातल्या 'त्या' वस्तूमुळे स्फोटानंतर पडला ८ फुटांचा खड्डा; हवाई दलाने दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 17:41 IST

राजस्थानमध्ये पोखरण फायरिंग रेंज एरियाजवळ भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानात तांत्रिक बिघाड आढळून आला

Indian Air Force:राजस्थानमधील जैसलमेरमधील पोखरणजवळील फील्ड फायरिंग रेंजमध्ये भीषण स्फोट झाला आहे. भारतीय वायुसेनेचे एक लढाऊ विमान पोखरण रेंजमधून जात असताना त्यातून एअर स्टोअर खाली पडले. त्यामुळे हा मोठा आवाज झाला. त्या स्फोटामुळे जमिनीत आठ फूट खोल खड्डा तयार झाला. आता त्या स्फोटाबाबत हवाई दलाकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या घटनेत सध्या कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

राजस्थानच्या थार वाळवंटात असलेल्या पोखरण फायरिंग रेंजजवळ बुधवारी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानात तांत्रिक बिघाड झाला. पोखरण फायरिंग रेंजजवळ हवाई दलाच्या लढाऊ विमानातून एक एअर स्टोअर विमाना बाहेर आले. या घटनेनंतर मोठा आवाज झाल्याने खळबळ उडाली होती. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता तिथे आठ फूटांचा खड्डा झाला होता आणि लोखंडी गोल तुकडा तिथे पडला होता. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून तो परिसर रिकामा केला. त्यानंतर या घटनेबाबात  भारतीय हवाई दलाने माहिती दिली. त्याचबरोबर तपासाचे आदेशही देण्यात आले आहेत.

भारतीय हवाई दलाने दिलेल्या निवेदनानुसार, हवाई दलाच्या लढाऊ विमानातून एअर स्टोअर खाली पडले आहे. "तांत्रिक बिघाडामुळे पोखरण फायरिंग रेंज एरियाजवळ भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानातून एक एअर स्टोअर अनवधानाने बाहेर पडले. या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही," असं भारतीय हवाई दलाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, हवाई दलाचे कोणते विमान होते, ते पोखरण रेंजजवळ का आले, या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. यात कोणीही जखमी झालेले नसले तरी मोठी दुर्घटना घडली नाही ही दिलासादायक बाब आहे. मात्र, मोठा स्फोट झाल्यामुळे  घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर काही लोकांना स्फोटाचा मोठा आवाज ऐकू आला. त्यानंतर पोलीस स्थानिक लोकांसह घटनास्थळी पोहोचले होते.

टॅग्स :Rajasthanराजस्थानindian air forceभारतीय हवाई दल