शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

OBC: २७ टक्के ओबीसी आरक्षणाची ३ गटात विभागणी; योगी सरकारचा सर्वात महत्त्वाचा निर्णय

By प्रविण मरगळे | Updated: January 6, 2021 18:08 IST

ओबीसी आरक्षणात सर्वात जास्त फायदा यूपीत यादव, कुर्मी, कुशवाहा आणि जाट समुदायाला मिळत होता, त्यामुळे ओबीसीमधील अन्य जाती अनेक वर्षापासून OBC आरक्षणात विभागणी करावी अशी मागणी करत होते

ठळक मुद्देभाजपाने २०१७ च्या निवडणुकीत गैर यादव समुदायाला आकर्षित करत १४ वर्षापासून दूर असलेली सत्ता मिळवलीयोगी सरकार सत्तेत आल्यानंतर न्या. रघुवेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ४ सदस्यीय समिती गठित केली होतीमागासलेले, अति मागासलेले आणि अत्यंत मागासलेले अशी विभागणी करण्यात येईल

लखनौ - उत्तर प्रदेशातील योगी सरकार मागासवर्गीयांना मिळणाऱ्या २७ टक्के आरक्षणात मोठा फेरबदल करणार आहे, राज्य सरकार लवकरच २७ टक्के आरक्षणात तीन गट करणार आहे, यात मागासलेला, अति मागासलेला आणि अत्यंत मागासलेला अशा तीन विभागात हे आरक्षण असेल, मागील सरकारच्या काळात मागासवर्गीयांना मिळणाऱ्या २७ टक्के आरक्षणात ६७.५६ टक्के लाभ एक विशिष्ट जातीला मिळाला आता असं होणार नाही अशी माहिती मागासवर्गीय कल्याण मंत्री अनिल राजभर यांनी पत्रकारांना दिली. 

ओबीसी आरक्षणात सर्वात जास्त फायदा यूपीत यादव, कुर्मी, कुशवाहा आणि जाट समुदायाला मिळत होता, त्यामुळे ओबीसीमधील अन्य जाती अनेक वर्षापासून OBC आरक्षणात विभागणी करावी अशी मागणी करत होते, भाजपाने २०१७ च्या निवडणुकीत गैर यादव समुदायाला आकर्षित करत १४ वर्षापासून दूर असलेली सत्ता मिळवली. त्यामुळेच योगी सरकार सत्तेत आल्यानंतर न्या. रघुवेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ४ सदस्यीय समिती गठित केली होती, ज्याचा रिपोर्ट २०१९ मध्ये सरकारला सोपवण्यात आला, मात्र हा रिपोर्ट सार्वजनिक करण्यात आला नाही. 

ओबीसी आरक्षणात मागासवर्गीयांची विभागणी करण्याची मागणीसाठीच सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओम प्रकाश राजभर यांनी भाजपाची साथ सोडली, योगी सरकारमधून मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. पण भाजपाचा अन्य सहकारी पक्ष सहयोगी पार्टी अपना दल(एस) यांनी योगी सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. 

यूपीत ओबीसी प्रवर्गात २३४ जातींचा समावेश उत्तर प्रदेशात ओबीसी अंतर्गत २३४ जातींचा समावेश आहे, उत्तर प्रदेश मागासवर्गीय सामाजिक न्याय समितीने आपल्या अहवालात २७ टक्के आरक्षणात ३ विभागणी करण्यात यावी अशी शिफारस केली. मागासलेले, अति मागासलेले आणि अत्यंत मागासलेले अशी विभागणी करण्यात येईल, मागासलेल्यामध्ये सर्वात कमी जाती ठेवण्याची शिफारस केली आहे, ज्यात यादव, कुर्मीसारख्या प्रगत जातींचा समावेश असेल. समितीच्या अहवालाच्या आधारे योगी सरकारमधील मंत्री अनिल राजभर यांनी ओबीसी आरक्षणात तीन विभागणी करण्याचं विधान केले आहे. 

ओबीसीच्या २७ टक्के आरक्षणात सुधारलेल्या यादव, अहिर, जाट, कुर्मी, सोनार आणि चौरसिया सरीखी अशा जातींचा समावेश आहे, या जातींना ७ टक्के आरक्षण देण्याची शिफारस आहे, अति मागासवर्गीयांमध्ये गिरी, गुर्जर, गोसाई, लोध, कुशवाहा, कुम्हारा, माली, लोहार यांच्यासह ६५ जाती आहेत, त्यांना ११ टक्के आरक्षण तर मल्लाह, केवट, निषाद, राई, गद्दी, घोसी, राजभरसारख्या ९५ जातींना ९ टक्के आरक्षण देण्याची शिफारस आहे.       

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश