ओबामांच्या सुरक्षेत माकडांची बाधा सुरक्षा अधिकाऱ्यांना चिंता : बेवारस कुत्र्यांनाही रोखायचे कसे?
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:33+5:302015-01-22T00:07:33+5:30
नितीन अग्रवाल

ओबामांच्या सुरक्षेत माकडांची बाधा सुरक्षा अधिकाऱ्यांना चिंता : बेवारस कुत्र्यांनाही रोखायचे कसे?
न तीन अग्रवालनवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या दिल्लीतील आगमनाच्यावेळी विविध स्तरीय सुरक्षा कडे तयार करण्यात आले असले तरी दिल्लीतील माकडे आणि बेवारस कुत्रे मोठा अडसर ठरू शकतात. ओबामा ज्या मौर्य शेरटेन हॉटेलमध्ये थांबणार आहेत त्या हॉटेलजवळ जंगलाचा परिसर असून माकडांच्या झुंडीच्या झुंडी दिवसभर धुमाकूळ घालत असतात. तसेच लुटियन झोन आणि रायसीना हिल या भागातही माकडांची दहशत ही काही नवी बाब नाही. सरकारी आकड्यांनुसार सुमारे साडेतीन लाख बेवारस कुत्र्यांचे वास्तव्य दिल्लीतील रस्त्यांवरच असते. या कुत्र्यांच्या त्रासामुळे गेल्या वर्षभरात २८ हजार बेवारस कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव डीएम सपोलिया यांनी वन, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला कामाला लावत भटक्या जनावरांच्या बंदोबस्तासाठी कृती योजना तयार करण्याचा आदेश दिला आहे.--------------------लंगूरचा आवाज काढण्यासाठी माणसे लागली कामीओबामा ज्या मौर्य शेरटेन होटल येथे थांबतील त्या जवळील जंगलांत गेल्या अनेक वर्षांपासून माकडांची दहशत आहे. नवी दिल्ली महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार या माकडांना उत्पातापासून व त्यांच्या या दहशतीपासून दूर ठेवण्यासाठी वन विभागाचे सहकार्य घेण्यात येते.या माकडांना पळविण्यासाठी लंगूर जातीच्या माकडांचा आवाज काढण्यासाठी अनेकांना काम देण्यात आले आहे. असे लुटियन झोनमध्ये सुमारे ४० जण कामाला लागले आहेत.