नायलॉन वापरावर जानेवारीपर्यंत निर्बंध
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:14+5:302014-12-20T22:27:14+5:30
जितेंद्र काकुस्ते यांची माहिती

नायलॉन वापरावर जानेवारीपर्यंत निर्बंध
ज तेंद्र काकुस्ते यांची माहितीनाशिक : जिल्ात ग्रामीण भागात पतंगासाठी नॉयलॉन दोर्याचा वापर वाढल्याचे निदर्शनास आले असून, मकर संक्रांतीच्या आधी व नंतर नॉयलॉनचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता असल्याने २२ डिसेंबर ते २० जानेवारीदरम्यान शहर व जिल्ात नायलॉन मांजा वापरावर निर्बंध घालण्यात आल्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांनी काढले आहेत.मकर संक्रांतीच्या सणानिमित्त संक्रांतीच्या काही दिवस आधी व नंतर पतंग उडविताना नायलॉनचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणात पक्षांना व नागरिकांना इजा होत असल्याचे प्रकार घडले आहेत. तसेच या नायलॉनच्या वापरामुळे अनेक प्रकारची हानी होत असल्याने निर्बंध घातलेल्या काळात नायलॉन मांजा व दोरा निर्मिती, विक्री व वापरावर निर्बंध घालण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहेत. या काळात जर नायलॉन मांजा व दोरा निर्मिती, विक्री अथवा वापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही जितेंद्र काकुस्ते यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)इन्फो..चोरीचा तपास संथचजिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या तीन संगणक चोरीचा तपास संथगतीने सुरू असून, संगणक चोरीबाबत संशय व्यक्त केला जात असून, यामागे रेशनचा काळाबाजार करणारे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.