आसाम हिंसाचारातील बळींची संख्या ३६ वर

By Admin | Updated: May 7, 2014 05:31 IST2014-05-07T05:17:20+5:302014-05-07T05:31:21+5:30

आसामातील बोडो अतिरेक्यांच्या हिंसाचार झेललेल्या कोक्राझार व बक्सा या दोन जिल्ह्यांत मंगळवारी आणखी दोन मृतदेह आढळून आल्याने बळींची संख्या ३६ वर पोहोचली आहे.

Number of victims of Assam violence in 36 | आसाम हिंसाचारातील बळींची संख्या ३६ वर

आसाम हिंसाचारातील बळींची संख्या ३६ वर

गुवाहाटी : आसामातील बोडो अतिरेक्यांच्या हिंसाचार झेललेल्या कोक्राझार व बक्सा या दोन जिल्ह्यांत मंगळवारी आणखी दोन मृतदेह आढळून आले़ याचबरोबर या हिंसाचारातील बळींची संख्या मंगळवारी ३६ वर पोहोचली़ दरम्यान, राज्यात कुठेही ताज्या हिंसाचाराची घटना नसल्याने संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारपेटा मार्गानजीक बेकी नदीतून सात वर्षांच्या बालिकेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, तर बक्सा येथे ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला़ या महिलेच्या मृतदेहावर गोळी लागल्याची कुठलीही जखम नाही़ त्यामुळे गुरुवारी रात्री अतिरेक्यांपासून स्वत:चा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात तिचा मृत्यू झाल्याचे मानले जात आहे़
सशस्त्र बोडो अतिरेक्यांनी आसाममधील कोक्राझार व बक्सा या दोन जिल्ह्यांमध्ये गुरुवारी रात्री व शुक्रवारी गोळीबार करीत बांगलादेशातून आलेल्या अल्पसंख्याकांना लक्ष्य केले होते़.

 

Web Title: Number of victims of Assam violence in 36