Corona Virus: सावधान! देशात उपचाराधीन रुग्णसंख्या वाढू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:53 AM2021-03-06T04:53:26+5:302021-03-06T04:53:43+5:30

Corona Virus: शुक्रवारी ११३ जणांचा बळी : १६,८३८ नवे रुग्ण; मृत्यूदर १.४१ टक्का, बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९७.०१ टक्के

number of patients undergoing treatment in the country began to increase | Corona Virus: सावधान! देशात उपचाराधीन रुग्णसंख्या वाढू लागली

Corona Virus: सावधान! देशात उपचाराधीन रुग्णसंख्या वाढू लागली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : देशात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ७६ हजारांवर पोहोचली असून, त्यांचे प्रमाणही वाढून १.५८ टक्के झाले. शुक्रवारी कोरोनाचे १६ हजार ८०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले व ११३ जणांचा बळी गेला. बरे झालेल्यांची संख्या १ कोटी ८ लाख ३९ हजारांवर पोहोचली आहे.
कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या देशामध्ये १ लाख ५७ हजारांहून अधिक, तसेच एकूण रुग्णांचा आकडा १ कोटी ११ लाख ७३ हजार झाला आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.४१ टक्के असून, बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९७.०१ टक्के आहे. जगामध्ये ११ कोटी ६२ लाख कोरोना रुग्ण असून, त्यातील ९ कोटी १९ लाख जण बरे झाले. उपचाराधीन रुग्णांची संख्या २ कोटी १७ लाख आहे व २५ लाख ८२ हजार जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. 

विषाणूंचे पुनरुत्पादन रोखणारी नवी उपचार पद्धती

n    कोरोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबविणारी नवी उपचार पद्धती अमेरिकेतील जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व एमोरी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे.
n    ते उपचार नेब्युलायझर या उपकरणाद्वारे करता येतील. त्याची प्रक्रिया इतकी सोपी आहे की रुग्णांना हे उपचार स्वत:च्या हाताने घरीदेखील करून घेता येतील.
१ कोटी ८० लाख लोकांना लस 
n    देशात आतापर्यंत १ कोटी ८० लाख लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे.
n    गेल्या चोवीस तासांत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांपैकी ८४.४४ टक्के रुग्ण महाराष्ट्र, पंजाब, हरयाणा, गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली या सहा राज्यांतील आहेत. २० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या प्रत्येकी एक हजारांपेक्षा कमी आहे.

Web Title: number of patients undergoing treatment in the country began to increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.