शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

मुंबईत रुग्णसंख्या घटली, सुमारे १० हजार खाटा रिक्त; मुंबई महापालिका आयुक्तांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 06:53 IST

एप्रिलमध्ये मुंबईतील सक्रिय रुग्णांचा आकडा सुमारे एक लाखापर्यंत गेला होता. तेव्हा दैनंदिन रूग्णसंख्या ९-१० हजारांच्या आसपास नोंदवली जात होती. त्यामुळे रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत होत्या.

मुंबई : कोरोनाचा प्रसार आता मुंबईत हळूहळू नियंत्रणात येत असल्याने रुग्णसंख्येतही मोठी घट होत आहे. त्यामुळे मुंबईतील १७८ रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांसाठी राखीव ९,२७९ खाटा रिकाम्या आहेत तर अतिदक्षता विभागातही आता १६४ खाटा रिक्त आहेत, अशी माहिती मुंबईचे पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी शनिवारी दिली. (The number of patients in Mumbai has decreased, 10,000 beds are vacant; Information of Mumbai Municipal Commissioner)

एप्रिलमध्ये मुंबईतील सक्रिय रुग्णांचा आकडा सुमारे एक लाखापर्यंत गेला होता. तेव्हा दैनंदिन रूग्णसंख्या ९-१० हजारांच्या आसपास नोंदवली जात होती. त्यामुळे रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत होत्या. बाधित रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेने टप्प्याटप्प्याने खाटांची संख्या वाढविण्यास सुरुवात केली. त्यानुसार कोविड रुग्णांसाठी १७८ रुग्णालयांमध्ये २२ हजार ७०३ खाटा राखीव ठेवण्यात आल्या. यापैकी ४० टक्के खाटा आता रिकाम्या आहेत.

आयसीयू, व्हेंटिलेटर खाटाही उपलब्ध...मार्च - एप्रिल महिन्यात रुग्णांचा आकडा वाढल्याने मुंबईत ऑक्सिजन खाटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे आयसीयू, व्हेंटिलेटर खाटाही कमी पडू लागल्या होत्या. मात्र, आता कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत असल्याने अतिदक्षता विभागातील रिक्त खाटांचे प्रमाणही १६४ आहे तर ३२ व्हेंटिलेटर खाटा रिक्त आहेत.

मुंबई पालिका आयुक्तांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्णमे २०२०मध्ये मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढल्यामुळे राज्य सरकारने इक्बालसिंह चहल यांची आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन कोरोना विरोधातील लढा यशस्वी करण्यात आला. चेस दि व्हायरस, वॉर्ड वॉर रूममार्फत खाटांचे नियोजन आणि आता मुंबई मॉडल आदर्श ठरले. धारावी पॅटर्नचे जागतिक स्तरावर कौतुक झाले. तर गेल्या महिन्यात संपूर्ण देशात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना, विविध उपाययोजना राबवून रुग्णांना वाचविण्याचे काम महापालिकेने केले. बाधित रुग्णांना शोधणे, विभाग स्तरावरील वॉर रूममार्फत रुग्णांना खाटा उपलब्ध करणे, जंबो फिल्ड रुग्णालयांची निर्मिती, खाटांची संख्या वाढवणे, आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवणे, खासगी रुग्णालयाने दिलेले सहकार्य. मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा प्रभाव, पालिका कर्मचारी-अधिकारी यांनी दिवस-रात्र केलेली मेहनत यामुळे पॉझिटिव्हिटीचा दर कमी आणण्यात यश आले, असे मत आयुक्तांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लसState Governmentराज्य सरकार