शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
8
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
9
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
10
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
11
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
12
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
13
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
14
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
15
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
16
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
17
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
18
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
19
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
20
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल

Omicron Corona Updates: देशात ओमायक्रॉनबाधितांचा आकडा १४००; मुलांचे लसीकरण; नावनोंदणीला प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 05:51 IST

१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी त्यांच्या नावांची को-विन ॲपवर नावनोंदणी करण्याकरिता पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केले आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात ओमायक्रॉनबाधितांची संख्या १४३१ वर पोहोचली असून त्यातील ३७४ जण बरे झाले. अशा प्रकारच्या रुग्णांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक असून त्यानंतर दिल्ली, तामिळनाडू, गुजरात, केरळचा क्रमांक लागतो. १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्यासाठी को-विन ॲपवर त्यांची नावनोंदणी शनिवारपासून सुरू झाली. 

१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी त्यांच्या नावांची को-विन ॲपवर नावनोंदणी करण्याकरिता पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केले आहे. ते म्हणाले की, जर मुले सुरक्षित असतील तर देशाचे भविष्यही सुरक्षित राहील. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी देशातील शास्त्रज्ञ, आरोग्यसेवक व अन्य कोरोना योद्धे अहोरात्र सक्रिय आहेत. ते नवीन वर्षातील आव्हानांचाही खंबीरपणे मुकाबला करतील.एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, ओमायक्राॅनच्या रुग्णांमध्ये ताप, नाकातून पाणी येणे, घसाखवखवणे, अंग किंवा डोकेदुखी अशी लक्षणे दिसतात. अशा व्यक्तींनी तत्काळ तपासणीकरून घेतली पाहिजे. या विषाणूचा रुग्ण घरीही विलगीकरणात राहू शकतो व लवकर बरा होतो. असे असले तरी लोकांनी कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळावेत व संसर्ग रोखण्यास मदत करावी.

नागरिकांनी घाबरू नये - डॉ. रणदीप गुलेरिया    एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, ओमायक्राॅनची संंसर्गशक्ती कोरोनाच्या इतर विषाणूंपेक्षा अधिक आहे. तो फुफ्फुसांऐवजी श्वसनमार्गावर हल्ला चढवितो.     त्यामुळे नव्या विषाणूंच्या रुग्णांपैकी खूपच कमी लोकांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याचे आढळून येईल. जे एकापेक्षा अधिक व्याधींनी ग्रस्त नाहीत, त्यांनी घाबरून जाऊ नये. कोणाही बाधिताने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रुग्णालयात दाखल होऊ नये.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस