मुस्लीम आमदारांची संख्या एकने घटली

By Admin | Updated: October 27, 2014 03:08 IST2014-10-27T03:08:19+5:302014-10-27T03:08:19+5:30

राज्याच्या तेराव्या विधानसभेसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अनेक ठिकाणी पचरंगी लढती झाल्या

The number of Muslim MLAs decreased by one | मुस्लीम आमदारांची संख्या एकने घटली

मुस्लीम आमदारांची संख्या एकने घटली

कुमार बडदे, मुंब्रा
राज्याच्या तेराव्या विधानसभेसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अनेक ठिकाणी पचरंगी लढती
झाल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतविभाजन झाले. त्यामुळे मुस्लीम समाजातील नेत्यांना आमदार म्हणून दोन आकडी संख्याही गाठता आली नाही. निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी मुस्लीम समाजातील
एकूण ४६ जण रिंगणात उतरवले
होते. त्यातील फक्त नऊ जण प्रत्यक्षात आमदार म्हणून निवडून आले आहेत.
मावळत्या विधानसभेतील आमदारांच्या तुलनेत या विधानसभेत मुस्लीम समाजाच्या आमदारांची संख्या एकने घटली आहे. २००९ च्या निवडणुकीत मुस्लीम समाजातील १० आमदार निवडून आले होते.
२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक पाच मुस्लीम उमेदवार निवडून आले. समाजवादी पक्षाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्र्रत्येकी एक मुस्लीम उमेदवार निवडून आला. तर एआईएमआईएम पक्षाचे दोन मुस्लीम उमेदवार निवडून आले.

Web Title: The number of Muslim MLAs decreased by one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.