नवी दिल्ली : ट्विटरने बनावट अकाउंट बंद करण्याची मोहीम धडाक्याने राबविण्यास सुरुवात केली असून, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत अकाउंट च्या फॉलोअरची संख्या दोन लाखांनी कमी झाली आहे. मोदींच्या ४.३३ कोटी फॉलोअरमध्ये घट होऊन ती संख्या आता ४.३१ कोटी झाली आहे.ट्विटरच्या मोहिमेमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकृत टिष्ट्वटर फॉलोअरच्या संख्येतही घट झाली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या फॉलोअरची संख्या १२ हजार ९७४ ने कमी झाली आहे. ट्रम्प यांच्या ४ कोटी ८० लाख फॉलोअरपैकी ३७ टक्के बनावट असल्याचे म्हटले जाते. मोदींच्या अधिकृत ट्विटर अकाउंटच्या ४ कोटींहून अधिक फॉलोअरपैकी २ कोटी ४१ लाख ८० हजार फॉलोअर बनावट आहेत असा दावा बर्सन-मॅर्स्टेलर या आंतरराष्ट्रीय स्तरावरील जनसंपर्क कंपनीने केला होता.सलमान, शाहरुखलाही फटका शाहरुख खान व सलमान खान या दोन अभिनेत्यांचे ट्विटरवरील फॉलोअरही प्रत्येकी सुमारे तीन लाखांनी कमी झाल्याचे वृत्त आहे.अफवा रोखण्यासाठी उचलले पाऊलसोशल मीडियातून अफवा व विद्वेषपूर्ण माहिती पसरविण्याच्या प्रकारांना आळा बसावा, यासाठी ट्विटर , व्हॉट्सअॅप, फेसबुक या सर्वांनीच बनावट अकाउंट बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. अशा अफवांमुळे देशात गेल्या काही दिवसांत जमावाने निरपराध व्यक्तींना जबर मारहाण करून ठार मारल्याच्या घटना घडल्या होत्या.
मोदींच्या ट्विटरवरील फॉलोअर्सच्या संख्येत २ लाखांनी घट, बनावट अकाउंट बंद करण्याचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 05:59 IST