आसाममधील मृतांची संख्या ५२ वर

By Admin | Updated: December 24, 2014 10:57 IST2014-12-24T02:54:23+5:302014-12-24T10:57:47+5:30

आसामच्या सोनितपूर आणि कोक्राझार जिल्ह्यात चार ठिकाणी एनडीएफबीच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या मालिकेतील मृतांची संख्या ५२ वर पोचली आहे.

The number of dead in Assam is 52 | आसाममधील मृतांची संख्या ५२ वर

आसाममधील मृतांची संख्या ५२ वर

गुवाहाटी : आसामच्या सोनितपूर आणि कोक्राझार जिल्ह्यात चार ठिकाणी एनडीएफबीच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या मालिकेतील मृतांची संख्या ५२ वर पोचली आहे. काल संध्याकाळी अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार करत निष्पाप नागरिकांना लक्ष्य केले. या गोळीबारातील मृतांची संख्या ५२ वर पोचली असून अनेक जण जखमी आहेत.

एनडीएफबीच्या अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार करीत एकट्या सोनितपूरमध्ये ३० जणांना ठार केले. त्यात विश्वनाथ चारीयाली येथील २४ जणांचा तर धेकियाजुली येथील ६ जणांचा समावेश आहे. एनडीएफबीच्या अतिरेक्यांनी मंगळवारी संध्याकाळी दोन जिल्ह्यांत उच्छाद घातला. कोक्राझारमध्ये चार आदिवासी मारले गेले. हल्ला झाला ते स्थळ आसाम आणि अरुणाचल च्या सीमेजवळ आहे. कोक्राझारच्या उल्टापानी या भागात नक्षलवाद्यांनी सहा ग्रेनेडचा स्फोट घडवला. त्यात तीन ठार झाल्याचा दावा केला आहे. कोक्राझारमध्ये आणखी तीन जण ठार झाल्याचे वृत्त असले तरी पोलिसांनी दुर्गम भागातील मृतदेह सापडले नसल्याने त्याला दुजोरा दिलेला नाही.

 

Web Title: The number of dead in Assam is 52

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.