शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: "येत्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढणार; पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 17:14 IST

संजय गांधी पदव्युत्तर वैद्यकीय विज्ञान संस्थेतील माजी प्राध्यापकांचा अंदाज

लखनऊ: जगातील कोरोना रुग्णांची संख्या ७० लाखांच्या आसपास पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ४ लाखांच्या पुढे गेला आहे. येत्या काही दिवसांतही कोरोना रुग्णांची संख्या वाढती राहणार असल्याचा अंदाज संजय गांधी पदव्युत्तर वैद्यकीय विज्ञान संस्थेचे माजी प्राध्यापक डॉ. मदन मोहन गोडबोले यांनी व्यक्त केला. कोरोनाबाधितांची संख्या वाढेल. पण विषाणू कमजोर होऊ लागल्यानं मृत्यूंचं प्रमाण कमी होईल, अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली. सध्या बहुतांश शास्त्रज्ञ कोरोनाची लस शोधण्यात व्यग्र आहेत. त्यातच अनलॉकच्या माध्यमातून देशातील जनजीवन पूर्वपदावर आल्यावर काय होईल, असा प्रश्न लोकांना पडला आहे. रस्ते, बस, रेल्वेमध्ये गर्दी वाढल्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव आणि मृतांची संख्या वाढेल, अशी भीती अनेकांवा वाटते. मात्र आपण विषाणूच्या उत्क्रांतीचा सिद्धांत लक्षात घेतल्यास चिंता कमी होईल, असं गोडबोले यांनी सांगितलं.  'विषाणूकडे दोन पद्धतीनं पाहिलं जातं. एक विषाणू जास्त धोकादायक असतो, तर दुसरा तितकासा घातक नसतो. धोकादायक विषाणूचा प्रसार कमी लोकांमध्ये होतो. तर तुलनेनं कमी धोकादायक विषाणूचा संसर्ग मात्र कमी जणांना होता. उत्क्रांतीचा सिद्धांत लक्षात घेतल्यास दोन विषाणूंच्या स्पर्धेत कमी धोकादायक विषाणू यशस्वी होतो. कारण त्याला जास्त दिवस आपल्या भोजन पुरवायचं असतं. त्याचं भोजन माणूस आणि इतर पशू असतात. विषाणू भोजनावर अवलंबून असतो आणि त्यामुळे हे भोजन संपू नये, असं त्याला वाटतं. त्यामुळे जास्त लोकांना बाधा होऊनही तो त्यांच्यासाठी जीवघेणा ठरत नाही,' असं गोडबोले यांनी सांगितलं....अन् आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधिताचा मृतदेह खड्ड्यात फेकला; व्हिडीओ व्हायरलरुग्णालयानं कोरोना चाचणी अहवाल येण्याआधीच मृतदेह ताब्यात दिला, 500 जणांच्या उपस्थितीत अंत्यविधी झाला अन्..."कोरोना संकट काळात मोदींसारखं नेतृत्त्व लाभणं हे देशाचं भाग्य"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या