शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जूनमध्ये हवाई प्रवाशांची संख्या रोडावली; कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 06:11 IST

क्षमतेपेक्षा मिळाले कमी प्रवासी

नवी दिल्ली : कोविड-१९ विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे भारतीय प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांना जूनमध्ये प्रवासी मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. विमानांना आसन क्षमतेच्या तुलनेत एक चतुर्थांश प्रवाशांसह उड्डाण करावे लागले.नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (डीजीसीए) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या जूनमध्ये भारतीय विमान वाहतूक कंपन्यांनी १.९८ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली. गेल्या वर्षी याच काळात हा आकडा तब्बल १२.०३ दशलक्ष होता. यावरून झालेली घसरण लक्षात यावी.

मोठ्या नियोजित व्यावसायिक एअरलाइन्सचा प्रवासी भार घटक (पॅसेंजर लोड फॅक्टर) ५४ टक्के ते ६८ टक्के यादरम्यान राहिला. याचाच अर्थ विमान कंपन्या अजून दोनतृतीयांश प्रवासी घेऊ शकल्या असत्या. २०१९ मधील प्रवासी भार घटक ८१ ते ९४ टक्के होता.भार घटक अथवा प्रवासी भार घटक हे हवाई वाहतूक क्षेत्रातील एअरलाइन्सचे प्रवासी वहन क्षमता मोजण्याचे एक मापक आहे.

भारतातील सर्वांत मोठी विमान वाहतूक कंपनी इंडिगोचा जूनमधील बाजार हिस्सा ५२.८ टक्के राहिला, तसेच कंपनीचा भार घटक ६०.७ टक्के होता. या महिन्यात कंपनीने १.०४ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली. स्पाईसजेटचा बाजार हिस्सा १६.८ टक्के आणि भार घटक ६८ टक्के राहिला. या कंपनीने ०.३३ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली. एअर इंडियाचा देशांतर्गत भार घटक ५६.५ टक्के राहिला आणि बाजार हिस्सा १२.२ टक्के राहिला. भारताच्या या राष्ट्रीय एअरलाईनने जूनमध्ये ०.२४ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली.

टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्स यांचा भागीदारीतील उद्यम असलेल्या विस्ताराचा भार घटक ५६.६ टक्के आणि बाजार हिस्सा ५.६ टक्के राहिला. टाटा सन्स आणि एअर एशिया बेºहाड यांचा संयुक्त उद्यम असलेल्या एअर एशियाचा भार घटक ५६.५ टक्के आणि बाजार हिस्सा ७.१ टक्के राहिला. वाडिया समूहाच्या गोएअरचा भार घटक ५७.९ टक्के आणि बाजार हिस्सा ४.५ टक्के राहिला.विस्ताराने १,१२,०० प्रवाशांची वाहतूक केली. एअर एशिया इंडियाने १,४०,००, तर गोएअरने ८९,००० प्रवाशांची वाहतूक केली.

वृद्धीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घसरण

आदल्या वर्षी या काळातील प्रवासी वाहतूक ७०.६६ दशलक्ष होती. याचाच अर्थ यंदा वार्षिक वृद्धी उणे (-) ५०.२२ टक्के, तसेच मासिक वृद्धी उणे (-)८३.५० टक्के राहिली, असे डीजीसीएने म्हटले आहे.

जूनमध्ये विस्ताराने 16.50% उड्डाणे रद्द केली. देशांतर्गत पूर्वनियोजित विमानांची उड्डाणे रद्द होण्याचे एकूण प्रमाण ३.०३ टक्के राहिले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याairplaneविमान