शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

नूंह हिंसाचार : ४४  FIR दाखल, ७० जण ताब्यात…; दंगेखोरांना सोडले जाणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 19:53 IST

या हिंसाचाराच्या संदर्भात आतापर्यंत ४४ एफआयआर नोंदवण्यात आले असून ७० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

नूंह : हरयाणामधील नूंह जिल्ह्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) धार्मिक यात्रेदरम्यान झालेला हिंसाचार आणि तणावानंतर येथे मोठ्या प्रमाणावर निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. या हिंसाचारात जवळपास पाच जण ठार तर अनेक जण जखमी झाले. व्हीएचपीच्या रॅलीमध्ये प्रमुख गोरक्षक मोनू मानेसर यांच्या कथित उपस्थितीवरून तणाव शिगेला पोहोचल्यानंतर नूंह आणि गुरुग्राममध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे आणि कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या हिंसाचाराच्या संदर्भात आतापर्यंत ४४ एफआयआर नोंदवण्यात आले असून ७० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी निमलष्करी दल आणि पोलिस दलाच्या २०-२० कंपन्या येथे तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही नूंहमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत बैठक घेतली. या बैठकीनंतर मनोहर लाल खट्टर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "नुंहमध्ये जे काही घडले ते दुर्दैवी आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी व प्रशासनाला तातडीने पाठविण्यात आले. दरवर्षी निघणाऱ्या सामाजिक यात्रेवर काही लोकांनी हल्ला केला. यावेळी पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आले."

याचबरोबर, मनोहर लाल खट्टर यांनी सांगितले की, "नियोजित आणि कट रचून यात्रा उधळली गेली, जे मोठे षड्यंत्र दर्शवते. वाहने जाळण्यात आली तर काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही समोर आल्या आहेत. मात्र, सध्या नुंहसह सर्वत्र परिस्थिती सामान्य आहे. या घटनेत सहभागी असलेल्या नूंह बाहेरील लोकांची ओळख पटवली जात आहे. दंगेखोरांना सोडले जाणार नाही. सर्व नागरिकांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढे यावे. कुठेही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाला कळवावे. हेल्पलाइन क्रमांक-११२ आणि ८९३०९००२८१ वर याबाबत माहिती देऊ शकतात."

पोलिसांनी काढला फ्लॅग मार्चनूंह येथील एसपी नरेंद्र सिंह बिजारणिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सद्यस्थितीची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, "जिल्ह्यात विविध ठिकाणी निमलष्करी दलाच्या २० कंपन्या आणि पोलिस दलाच्या २० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय, सकाळी पोलिस दलाकडून फ्लॅग मार्चही काढण्यात आला आहे. कलम-१४४ चे पालन सुनिश्चित केले जात आहे आणि कर्फ्यू नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. तसेच, काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

टॅग्स :Haryanaहरयाणा