पावसाला प्रसन्न करण्यासाठी मुलाची काढली नग्न धिंड

By Admin | Updated: June 17, 2016 13:50 IST2016-06-17T13:38:17+5:302016-06-17T13:50:29+5:30

पावसाला प्रसन्न करण्यासाठी एका अल्पवयीन मुलाची नग्न धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना कर्नाटकाच्या चित्रदुर्ग जिल्हयातील पांदरहाली घडली आहे.

Nude shinde removed from child's son to please the rain | पावसाला प्रसन्न करण्यासाठी मुलाची काढली नग्न धिंड

पावसाला प्रसन्न करण्यासाठी मुलाची काढली नग्न धिंड

ऑनलाइन लोकमत 

चित्रदुर्ग, दि. १७ - पावसाला प्रसन्न करण्यासाठी एका अल्पवयीन मुलाची नग्न धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना कर्नाटकाच्या चित्रदुर्ग जिल्हयातील पांदरहाली गावात घडली आहे. १० जून रोजी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 
 
सर्वप्रथम मुलावर पाणी शिंपडण्यात आले. त्यानंतर गावक-यांनी पूजा केली. पूजा झाल्यानंतर मुलाच्या डोक्यावर मूर्ती ठेऊन त्याला नग्नावस्थेत गावभर फिरवण्यात आले. 
 
यावेळी सोबत चालणारे गावकरी घोषणा देत होते. काही जण ढोल बडवित होते. सर्व विधी झाल्यानंतर या मुलाला घालण्यासाठी नवीन कपडे देण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दुष्काळाच्या फे-यातून सुटका व्हावी यासाठी अशी विचित्र पूजा केल्याचे गावक-यांनी सांगितले. 

Web Title: Nude shinde removed from child's son to please the rain