शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

न्यूड, सेक्सी दुर्गा इफ्फी वाद : फिल्ममेकर सुजॉय घोष यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 17:11 IST

मराठी चित्रपट न्यू़ड आणि मल्याळी चित्रपट सेक्सी दुर्गा 48 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमधून (इफ्फी) वगळण्यात आल्यामुळे ज्युरी मेंबर्सच्या अध्यक्षपदाचा फिल्ममेकर सुजॉय घोष यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान, सुजॉय रॉय यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला आहे.

ठळक मुद्देज्युरी मेंबर्सच्या अध्यक्षपदाचा फिल्ममेकर सुजॉय घोष यांनी दिला राजीनामा न्यूड आणि सेक्सी दुर्गा चित्रपट इफ्फीतून वगळले. अनेकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

मुंबई : मराठी चित्रपट न्यू़ड आणि मल्याळी चित्रपट सेक्सी दुर्गा 48 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमधून (इफ्फी) वगळण्यात आल्यामुळे ज्युरी मेंबर्सच्या अध्यक्षपदाचा फिल्ममेकर सुजॉय घोष यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान, सुजॉय रॉय यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला आहे.येत्या 20 नोव्हेंबरपासून गोव्यात आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल साजरा होणार आहे. सुजॉय घोष यांच्या अध्यक्षतेखालील तेरा ज्युरी मेंबर्सनी एकूण 24 चित्रपटांची इंडियन पॅनोरमा विभागासाठी निवड केली होती. पॅनारोम विभागात न्यू़ड आणि सेक्सी दुर्गा या चित्रपटांचे स्क्रीनिंग होणार होते. पण, अंतिम टप्प्यात माहिती व प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या यादीतून या दोन्ही चित्रपटांना वगळण्यात आले. चित्रपटांच्या नावावर आक्षेप घेत माहिती व प्रसारण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमधून वगळल्याची माहिती मिळते.दरम्यान, माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या या निर्णयाबद्दल न्यूड चित्रपटाचे दिग्दर्शक रवि जाधव आणि सेक्सी दुर्गाचे दिग्दर्शक सनलकुमार ससीधरन यांच्यासह अनेकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच, केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध दर्शवत ज्युरी मेंबर्सचे अध्यक्ष आणि फिल्ममेकर सुजॉय घोष यांनी राजीनामा दिल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दिग्दर्शक रवि जाधव यांचा न्यूड हा चित्रपट न्यूड मॉडेल म्हणून काम करणाऱ्या एका तरूण स्त्रीच्या जीवनावर आधारीत आहे. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमधील स्क्रीनिंगसाठी निवड झाल्याचे वाटले होते. पण, सकाळी वृत्तपत्रात बातमी बघितल्यावर चित्रपटाला वगळल्याचे समजले आणि केंद्र सरकारच्या निर्णयामुळे माझी निराशा झाली, असे रवि जाधव यांनी म्हटले होते. ज्युरी जो निर्णय घेतो तो अंतिम असतो, असे माझे व्यक्तिगत मत आहे. पण ज्युरी मेंबरला कल्पना न देता चित्रपटाचे नाव वगळणे, कुणालाही रूचणार नाही. निर्णय घेताना ज्युरीला कल्पना द्यायला हवी होती, असे रवि जाधव यांनी म्हटले होते. याचबरोबर सेक्सी दुर्गा या चित्रपटातून समाजामधील गडद वास्तव आकर्षकपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे या चित्रपटाचे दिग्दर्शक सनलकुमार ससिधरन यांनी सांगितले होते.

टॅग्स :cinemaसिनेमा