शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशमधल्या एनटीपीसी प्लँटमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट, 20 मजुरांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 09:27 IST

रायबरेली- उत्तर प्रदेशमधल्या उंचाहार परिसरातील एनटीपीसी पॉवर प्लँटमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट झालाय. या स्फोटात 20 मजुरांचा मृत्यू झाला आहे.

रायबरेली- उत्तर प्रदेशमधल्या उंचाहार परिसरातील एनटीपीसी प्लँटमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट झालाय. या स्फोटात 20 मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे. एनटीपीसी प्लँटमधील बॉयलरच्या स्टीम पाइपचा स्फोट झाल्यानं ही दुर्घटना घडली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उंचाहार एनटीपीसीमध्ये 500 मेगावॉट युनिटमध्ये हा स्फोट झालाय. घटनास्थळावरून आतापर्यंत 16 मृतदेह ताब्यात घेण्यात आलेत. दुर्घटनेच्या वेळी तिथे जवळपास 500 मजूर काम करत होते. पॉवर प्लँटमधल्या पाइपलाइनवर मोठा दबाव आल्यामुळे हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती रायबरेलीच्या जिल्हाधिका-यांनी दिली आहे. या भीषण स्फोटामुळे लागलेल्या आगीच्या विळख्यात तिथे काम करणारे 20 मजूर सापडले आणि त्यांचा मृत्यू झाला. तर 100हून अधिक प्रवासी जखमी आहेत. एनटीपीसी परिसरात सध्या बाहेरील लोकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. 

 

स्फोटात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. मात्र, अनेक जण गंभीररीत्या जखमी असल्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश सरकारनेही तात्काळ दखल घेत तातडीनं उपाययोजना केल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या मॉरिशिअसच्या दौऱ्यावर आहेत. परंतु त्यांनी अधिका-यांना बचावकार्य राबवण्याचे आदेश दिले आहेत.  बॉयलरचा स्टीम पाइप फुटल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. 500 मेगावॉटच्या प्रकल्पात हा स्फोट झाला आहे. अनेक कामगार आगीत होरपळल्याने गंभीर स्वरूपात जखमी झालेत. त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीनं जवळच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात येत आहे. या स्फोटानंतर प्रकल्पाच्या ठिकाणी असलेले कामगार घाबरून सैरावैरा पळत सुटले. सध्या खबरदारी म्हणून एनटीपीसी प्रकल्पाच्या हद्दीत बाहेरच्या लोकांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, काही वेळापूर्वीच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे 32 जवान रायबरेलीला दाखल झाले आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघात