शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'कोरोनाचे नवीन व्हेरिएंट्स येतच राहतील, घाबरण्याची गरज नाही', डॉ. एन. के. अरोरा यांचे मत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 14:13 IST

NTAGI : लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे (NTAGI) अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे. नागरिकांनी चिंता करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या XE स्ट्रेनमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच भारतातही  XE स्ट्रेनचे दोन रुग्ण आढळल्यामुळे लोकांची चिंता वाढली आहे. मात्र, कोरोना व्हायरसच्या XE स्ट्रेनवरील जगभरातील गोंधळादरम्यान भारताच्या लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे (NTAGI) अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे. नागरिकांनी चिंता करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच, डॉ. एन. के. अरोरा यांच्या मते, कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट, हा व्हायरच्या इतर अनेक नवीन व्हेरिएंट्सला प्रोत्साहन देत आहे. यामध्ये X सिरिजचे व्हेरिएंट्स आहेत, जसे की XE स्ट्रेन यूकेमधून उद्भवला. परंतु यापैकी कोणताही स्ट्रेन गंभीर त्रास देणारा नाही आहे.

"कोरोना व्हायरसचे ओमायक्रॉन प्रकार त्याच्या अनेक नवीन रूपांना जन्म देत आहे. जसे की X सिरीजमधील वेरिएंट, त्यापैकी एक XE स्ट्रेन आहे. कोरोना व्हायरसचे नवीन व्हेरिएंट येत राहतील. घाबरण्यासारखे काही नाही. सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, तो भारतात फार वेगाने पसरत असल्याचे दिसत नाही", असे डॉ. एन.के. अरोरा यांनी म्हटले  आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या XE स्ट्रेनला ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या  BA.1 आणि BA.2 स्ट्रेनमधून तयार झालेला स्ट्रेन म्हटले आहे. तसेच, कोरोना व्हायरसचा नवीन XE स्ट्रेन ओमायक्रॉनपेक्षा 10 टक्के जास्त संसर्गजन्य आहे, असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. 

भारतात XE स्ट्रेनचे पहिले प्रकरण गुजरातमध्ये आढळून आले आहे. याआधीही मुंबईत एक रुग्ण आढळून आला असला तरी त्याला XE ची लागण झाल्याची पुष्टी झालेली नाही. आतापर्यंत कोरोना व्हायरसचे अनेक व्हेरिएंट समोर आले आहेत. यापैकी डेल्टा व्हेरिएंटने सर्वाधिक कहर केला. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी डेल्टा व्हेरिएंट जबाबदार होता, ज्यामुळे गेल्या वर्षी एप्रिल ते मे दरम्यान देशात हाहाकार माजला होता. यादरम्यान लाखो लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला होता.

दरम्यान, भारतात कोरोना संसर्गाचा वेग आता मंदावला आहे. देशात दररोज आढळणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 1000 च्या जवळपास पोहोचली आहे. मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. याचबरोबर, सक्रिय प्रकरणे देखील आता 10000 च्या आसपास आहेत. आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ यामागे लसीकरण हे सर्वात मोठे कारण मानत आहेत. भारतातील मोठ्या लोकसंख्येला कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. आता 18 वर्षांवरील सर्व लोकांना बूस्टर डोस मिळू लागला आहे. तसेच, 12 ते 18 वर्षे वयोगटातील बहुतांश लोकांना कोरोना लसीचे डोस मिळाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनCorona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्य