'एनएसजी'ची वेबसाइट हॅक, मोदींसंदर्भात आक्षेपार्ह मजकूर
By Admin | Updated: January 1, 2017 21:11 IST2017-01-01T17:23:47+5:302017-01-01T21:11:34+5:30
भारताची दहशतवादविरोधी सेनेची राष्ट्रीय सुरक्षा रक्षकां (एनएसजी)संदर्भात असलेली अधिकृत वेबसाइट काही अज्ञातांनी हॅक केली

'एनएसजी'ची वेबसाइट हॅक, मोदींसंदर्भात आक्षेपार्ह मजकूर
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - भारताची दहशतवादविरोधी सेनेची राष्ट्रीय सुरक्षा रक्षकां (एनएसजी)संदर्भात असलेली अधिकृत वेबसाइट काही अज्ञातांनी हॅक केली आहे. रविवारी ही वेबसाइट हॅक करण्यात आली असून, हॅकर्सने Alone Injector अशी स्वतःची ओळख सांगितली आहे. हॅकर्सनं या वेबसाइटवर मोदींसंदर्भात काही आक्षेपार्ह मजकूरही टाकला आहे. वेबसाइटच्या होमपेजवर नागरिकांना पोलीस मारहाण करत असल्याचे फोटोही अपलोड करण्यात आले आहेत. तसेच काश्मीरला स्वतंत्र करा, असा मजकूरही टाकण्यात आला आहे.
(बोर्डिंग शाळांची माहिती असलेली वेबसाइट हॅक)
वेबसाइट पाकिस्तानस्थित हॅकर्सनी हॅक केल्याची शक्यता भारतीय गुप्तचर विभागानं व्यक्त केली आहे. वेबसाइटवर पाकिस्तानच्या समर्थनार्थ मजकूरही अपलोड करण्यात आला आहे. तत्पूर्वी लिजियन ग्रुपकडून अशाच प्रकारे काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. त्यावेळीही राहुल गांधींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अश्लील मजकूर टाकण्यात आला होता.