शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
2
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
3
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
4
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
5
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
6
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
7
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
8
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
9
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
10
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
11
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
12
पनवेलमध्ये 'मविआ'ला उमेदवारांनीच दिला झटका! ७ जणांची माघार, भाजपाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी?
13
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
14
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
15
कधी काळी सचिन तेंडुलकरची झोप उडवणारा गोलंदाज; आज क्रूझ शिपवर गाणी गाऊन उदरनिर्वाह
16
कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
17
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
18
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
19
Viral Video: "बिहारमध्ये २०-२५ हजारांत मुली मिळतात", कॅबिनेट मंत्र्यांच्या पतीचं वादग्रस्त वक्तव्य
20
Uma Bharti : "लाजिरवाणं, अत्यंत कलंकित; आयुष्याची किंमत २ लाख..."; उमा भारतींचा भाजपाला घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

मशीद तोडणाऱ्यांना पुरस्कार, असदुद्दीन ओवेसींचा केंद्र सरकारवर निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 18:56 IST

केंद्र सरकारच्या या निर्णयावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्दे'हा नवा भारत आहे, याठिकाणी गुन्हेगारीला पुरस्कार दिला जातो'महंत नृत्य गोपाल दास यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड रामनवमी 2 एप्रिल रोजी आहे. त्यादिवशी मंदिर उभारणीचे काम सुरू करावे, असाच ट्रस्टचा प्रयत्न आहे.

हैदराबाद : केंद्र सरकारने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील आरोपी नृत्य गोपाल दास यांना अध्यक्ष आणि व्हीएचपीचे उपाध्यक्ष चंपत राय यांची महासचिव म्हणून निवड केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे.  हा नवा भारत असून या ठिकाणी गुन्हेगारीचे काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिला जातो, असे सांगत असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी यांदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले, "सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय देताना मशीद विध्वंस करण्याचे कृत्य लाजिरवाणे असल्याचे म्हटले होते. हा त्याचाच सिक्वल आहे. एक व्यक्ती जो बाबरी मशीद पाडण्याचा आरोपी आहे, त्याच्याकडे सरकारने राम मंदिर उभारणीची जबाबदारी सोपविली आहे. हा नवा भारत आहे, याठिकाणी गुन्हेगारीला पुरस्कार दिला जातो." 

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या काल झालेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत महंत नृत्य गोपाल दास यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर चंपत राय यांना या ट्रस्टचे सरचिटणीस बनविण्यात आले. महंत नृत्य गोपाल दास 1984 पासून राम मंदिर आंदोलनाशी निगडीत आहेत. त्यांच्याच अध्यक्षतेखाली मंदिर कार्यशाळेत राम मंदिरासाठी दगड शोधण्याचे काम सुरू होते. बाबरी विध्वंसानंतर सीबीआय कोर्टात दास आणि राय यांच्याविरुद्ध खटला सुरू आहे.

दरम्यान, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या कामाला आता सुरुवात झाली असून, पुढील 15 दिवसांत प्रत्यक्ष मंदिर बांधकाम कधी सुरू करायचे, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी ट्रस्टचे पदाधिकारी लवकरच अयोध्येत जाणार असून, तेथील संत-महन्तांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष भूमिपूजनाची तारीख ठरविण्यात येईल. ट्रस्टच्या कालच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रामनवमी 2 एप्रिल रोजी आहे. त्यादिवशी मंदिर उभारणीचे काम सुरू करावे, असाच ट्रस्टचा प्रयत्न आहे. पण तोपर्यंत सर्व औपचारिक बाबी पूर्ण झाल्या, तरच कामास प्रारंभ करता येणार आहे.

2024पर्यंत मंदिर पूर्ण?या मंदिराचे काम कधीही सुरू झाले तरी ते 2024 पर्यंत कोणत्याही स्थितीत पूर्ण व्हावे, असा ट्रस्ट प्रयत्न करेल. किंबहुना ते मंदिर तोपर्यंत बांधून पूर्ण करायचे, असेच ठरविण्यात आले आहे. लोकसभेच्या पुढील निवडणुका 2024मध्ये होतील. त्याआधी मंदिर झाले, तर त्याचा फायदा भाजपला मिळेल, असे त्या पक्षाच्या तसेच संघ परिवारातील मंडळींचे म्हणणे आहे. आम्ही आमची घोषणा पूर्ण केली, असे सरकारही तेव्हा सांगू शकेल. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या