एनआरआय चौकट
By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:17+5:302015-07-06T23:34:17+5:30
जुने पोलीस स्टेशन गैरसोयीचे

एनआरआय चौकट
ज ने पोलीस स्टेशन गैरसोयीचे विद्यमान स्थितीमध्ये बेलापूर गावात असणारे पोलीस स्टेशन उलवे परिसरातील नागरिकांना गैरसोयीचे आहे. पोलीस स्टेशन शोधण्यामध्येच बराचसा वेळ जात आहे. लॉकअप नसल्यामुळे पोलीस कर्मचार्यांना आरोपींना सारखे नेरूळ ते एनआरआय व न्यायालयापर्यंत धावपळ करावी लागत आहे. नवीन पोलीस स्टेशन महापालिकेच्या नवीन मुख्यालयासमोर आहे. सदर ठिकाणी बेलापूर, सीवूड, उलवे सर्व नागरिकांना सोयीचे आहे. लवकरात लवकर नवीन ठिकाणी पोलीस स्टेशन स्थलांतर करावे अशी मागणी पोलीस कर्मचार्यांसह नागरिकही करू लागले आहेत. चौकटपोलीस कर्मचार्यांच्या आरोग्यास धोका जुन्या पोलीस स्टेशनमध्ये पावसाळ्यात पाणी गळत आहे. पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळत नाही. प्रसाधनगृह पुरेसे नाही. पोलीस स्टेशनच्या आवारात जुनी विहीर आहे. त्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे पावसाळ्यात डेंग्यू व मलेरियाची साथ पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांची वाट न पाहता तत्काळ उद्घाटनाचे सोपस्कर पूर्ण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चौकटफोटो आहेत०६एनआरआय ओल्ड - एनआरआय पोलीस स्टेशनची गळकी इमारत ०६एनआरआय न्यू - महापालिका मुख्यालयासमोर बांधण्यात आलेली पोलीस स्टेशनची नवीन इमारत