शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कॉर्पोरेट कर्जाचा एनपीए सव्वा दोन लाख कोटी

By admin | Updated: May 16, 2016 03:59 IST

कॉर्पोरेट कंपन्यांमुळे डिसेंबर २०१५ पर्यत बँकांचे २ लाख २३ हजार ६१३ कोटी रुपये बुडित खात्यात गेले आहेत.

प्रमोद गवळी,

नवी दिल्ली-बँकांकडून कर्ज घेऊन त्याची परतफेड न करण्याऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांमुळे डिसेंबर २०१५ पर्यत बँकांचे २ लाख २३ हजार ६१३ कोटी रुपये बुडित खात्यात गेले आहेत. असे असतानाही सरकार बड्या कर्जदारांची नावे जाहीर करण्यास घाबरत आहे.अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिलेल्या माहितीवरून हे तथ्य उघडकीस आले. राज्यसभेत काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारला होता. सिन्हा यांनी सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची डिसेंबर २०१५ पर्यंत सकल थकीत कर्जाची रक्कम (जीएनपीए) ३ लाख ६१ हजार ७३१ कोटी झाली होती. त्यांच्या सांगण्यानुसार बँकांकडून कर्ज वसुलीचे सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. सरकारने वीज, रस्ते, पोलाद, वस्त्रोद्योगसारख्या क्षेत्रात वसुलीसाठी ३३ कर्जवसुली लवादांशिवाय (डीआरटी) सहा नव्या लवादांच्या स्थापनेस मंजुरी दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने सुद्धा अनेक पावले उचलली आहेत. याअंतर्गत कर्जाची फेररचना करण्यासाठी संयुक्त कर्जदार मंच, पायाभूत आणि मूलभूत उद्योगांना दीर्घकालीन कर्ज योजनेत लवचिकता आणणे आदींचा समावेश आहे.सरकारने विविध कायद्यांतर्गत कर्जदारांनी टाळाटाळ केल्यास हमी देणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी बँकांना सूचना दिली आहे. कारण कर्ज परतफेडीसंदर्भात हमीदारही कर्जदाराएवढाच जबाबदार असतो.