आता स्पर्धा टॉप 20 साठी
By Admin | Updated: August 28, 2015 00:30 IST2015-08-28T00:30:52+5:302015-08-28T00:30:52+5:30
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेच्या यादीत सोलापूरचे नाव आले, पण आणखी अजून एक पायरी चढायची आहे. लोकसहभाग व स्मार्ट सिटी योजनेचा प्रकल्प अहवाल केंद्र शासनाला पाठवायचा आहे. पहिल्या टप्प्यात 20 शहरांची निवड होणार आहे. त्यासाठी 100 मार्कांची परीक्षा होणार असून यात पास झालेल्यांची मुलाखत होऊन निवड जाहीर होईल. यात महापालिकेने केलेल्या कामाला 30 मार्क व प्रकल्प अहवालास 70 मार्क असणार आहेत. प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी लवकरच एजन्सीची निवड केली जाणार असल्याची माहिती आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी दिली. 98 सिटींची निवड जाहीर करताना केंद्र शासनाने राज्य शासनाने शिफारस केलेल्या शहरांची तपासणी करून खातरजमा केली आहे. प्रस्तावासोबत जोडलेले प्रकल्प अहवाल खरे आहेत काय, याची खातरजमा केल्याचे काळम-पाटील म्हणाले.

आता स्पर्धा टॉप 20 साठी
क ंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेच्या यादीत सोलापूरचे नाव आले, पण आणखी अजून एक पायरी चढायची आहे. लोकसहभाग व स्मार्ट सिटी योजनेचा प्रकल्प अहवाल केंद्र शासनाला पाठवायचा आहे. पहिल्या टप्प्यात 20 शहरांची निवड होणार आहे. त्यासाठी 100 मार्कांची परीक्षा होणार असून यात पास झालेल्यांची मुलाखत होऊन निवड जाहीर होईल. यात महापालिकेने केलेल्या कामाला 30 मार्क व प्रकल्प अहवालास 70 मार्क असणार आहेत. प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी लवकरच एजन्सीची निवड केली जाणार असल्याची माहिती आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी दिली. 98 सिटींची निवड जाहीर करताना केंद्र शासनाने राज्य शासनाने शिफारस केलेल्या शहरांची तपासणी करून खातरजमा केली आहे. प्रस्तावासोबत जोडलेले प्रकल्प अहवाल खरे आहेत काय, याची खातरजमा केल्याचे काळम-पाटील म्हणाले.