शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

‘अब की बार, भाजप नहीं ३०० के पार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 6:18 AM

विरोधकांचा दावा : आज दिल्लीत भेटणार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘अब की बार, ३०० के पार' हा भाजपने केलेला दावा खरा होण्याची शक्यता असल्याचे बहुतांश एक्झिट पोलनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात प्रचंड उत्साहाचे वातावरण असले, तरी एक्झिट पोलचे निष्कर्ष चुकीचे असल्याचा दावा ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, शशी थरुर आदी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. त्यातच एक्झिट पोलचे निकाल अनेकदा चुकले असून, ते एक्झॅक्ट पोल नव्हेत, असे खुद्द उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहेत.

आंध्र प्रदेश, ओडिशा, तसेच सिक्किम व अरुणाचल प्रदेश विधानसभेत आहेत तेच पक्ष पुन्हा सत्तेवर येतील, असे काही एक्झिट पोल्सनी म्हटले आहे. त्यामुळे आंध्रात चंद्राबाबू नायडू, ओडिशात नवीन पटनायक, सिक्किममध्ये एसडीएफचे पवनकुमार चामलिंग व अरुणाचलमध्ये भाजपचे पेमा खांडू हेच मुख्यमंत्री बनू शकतील. अर्थात, काही एक्झिट पोल्सनी आंध्रात जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविली आहे.पुढील रणनीती ठरविण्यासाठी भाजपप्रणित रालोआमध्ये नसलेल्या काही पक्षांचे नेते उद्या, मंगळवारी दिल्लीत भेटणार आहेत. त्याची तयारी चंद्राबाबू नायडू संबंधित नेत्यांना भेटून करीत आहेत. अखिलेश यादव यांनी आज मायावती यांची भेट घेतली, तर चंद्राबाबूंनी ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. चंद्राबाबू म्हणाले की, लोकांची नाडी ओळखण्यात एक्झिट पोल अपयशी ठरले आहेत. आंध्रात पुन्हा तेलगू देसमचेच सरकार, तर केंद्रामध्ये बिगरभाजप पक्षांचे सरकार स्थापन होईल.

काँग्रेसचे नेते शशी थरुर म्हणाले की, आॅस्ट्रेलियातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये तर ५६ एक्झिट पोल चुकीचे ठरले. पोल घेणारे लोक सरकारी कर्मचारी असावेत, अशी समजूत झाल्याने लोक आपल्या मनातला खरा विचार त्यांना सांगत नाहीत. पिनराई विजयन, एच. डी. कुमारस्वामी, स्टॅलिन, आपचे नेते संजय सिंह, पंजाबचे अमरिंदर सिंह यांनीही एक्झिट पोलवर टीका केली आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, एक्झिट पोल घेणाऱ्या लोकांना वश करून घेता येते. त्यामुळे या पोलच्या निष्कर्षांवर माझा काडीमात्र विश्वास नाही. ओमर अब्दुल्ला म्हणाले आहे की, सर्वच एक्झिट पोल चुकीचे आहेत, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे टीव्ही बंद करा, सोशल मीडियापासून दूर राहा आणि २३ मे रोजी निकालाची वाट पाहा.

आव्हान आणि प्रतिआव्हानया एक्झिट पोलनंतर लगेचच भाजपने मध्य प्रदेश विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून मुख्यमंत्री कमलनाथ यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी विनंती राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना केली. त्यावर आपण बहुमत सिद्ध करण्यास तयार आहोत, असे प्रतिआव्हान कमलनाथ यांनी भाजपला दिले.1लोकसभेच्या एक्झिट पोलमुळे कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमधील काँग्रेस नेते धास्तावले आहेत.2केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, एच. डी. कुमारस्वामी, एम. के. स्टॅलिन, आपचे नेते संजय सिंह, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनीही एक्झिट पोलच्या निष्कर्षांवर टीका केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९