शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता विरोधकही म्हणतात, एनडीए ४०० जागा जिंकणार; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 09:19 IST

लूट आणि फूट हा काँग्रेस पक्षासाठी ऑक्सिजन : पंतप्रधान मोदी

झाबुआ : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप ३७० जागांचा आकडा पार करेल असा विश्वास आहे आणि संसदेतील विरोधी पक्षांचे नेतेही सत्ताधारी आघाडीला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील असे सांगत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तर,  लूट आणि फूट हा काँग्रेस पक्षासाठी ऑक्सिजन आहे, अशा शब्दात त्यांनी रविवारी येथे काँग्रेसवर हल्लाबोल केला. 

मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात आदिवासी समुदायाच्या जाहीर सभेला संबोधित करताना, पंतप्रधान मोदी यांनी आदिवासींची पारंपरिक वस्त्रे परिधान केली होती. ते म्हणाले की, लूट आणि फूट हे काँग्रेसचे ब्रीदवाक्य आहे. काँग्रेस सत्तेत असताना लूटमार करते, सत्तेबाहेर असताना समाजात भाषा, प्रदेश आणि जातीच्या आधारे विभागणी करते. लूट आणि फूट काँग्रेससाठी ऑक्सिजन आहे. मोदी म्हणाले की, आपण आदिवासी आणि गरिबांच्या भल्यासाठी काम करत आहोत. त्यामुळे काँग्रेस आणि इतर विरोधी नेते आपणावर टीका करतात.

पंतप्रधान मुलाला म्हणाले, मला तुझे प्रेम मिळाले...नरेंद्र मोदी रविवारी मध्य प्रदेशातील झाबुआ येथे आदिवासी समुदायाच्या सभेसाठी दाखल झालेले असताना एक लहान मुलगा त्यांच्याकडे पाहून हात हलवून आपले प्रेम व्यक्त करत होता. ते पाहून मोदी त्या मुलाला म्हणाले की, मला तुझे प्रेम मिळाले बेटा. आता हात खाली कर. नाही तर तो दुखेल. हा मुलगा गर्दीमध्ये आनंदाने ओरडत होता. येथे त्यांनी ७५५० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले.

‘भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण व्यवस्थेची गरज’ टंकारा (गुजरात) : भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण व्यवस्था ही काळाची गरज आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील त्यांच्या जन्मस्थानी टंकारा येथील कार्यक्रमात ते बाेलत हाेते.

लाेकांकडून मिळाले प्रचंड प्रेम : नरेंद्र माेदीकाँग्रेस आदिवासीविरोधी आहे आणि फक्त निवडणुकीच्या वेळी गावे, शेतकरी आणि गरिबांचा विचार करते, अशी टीका माेदींनी केली. देशाच्या दक्षिणेतील प्रभू रामाशी संबंधित मंदिरांना भेटी दिल्याने लोकांकडून त्यांना प्रचंड प्रेम मिळाले. पराभवाची जाणीव असल्याने काँग्रेस आणि त्यांचे सहयोगी शेवटचे डावपेच अवलंबत आहेत, असे माेदी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस