शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

आता ग्रामीण भागातही इंटरनेट सुपरफास्ट चालणार, इस्रो जीसॅट-२० उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 09:14 IST

...इस्रो या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीसॅट-२० हा उपग्रह स्पेसएक्सच्या फाल्कन-९ या अग्निबाणाद्वारे अवकाशात प्रक्षेपित करणार आहे.

नवी दिल्ली : देशाच्या ब्रॉडबँड, इन-फ्लाईट व मेरिटाइम कम्युनिकेशन (आयएफएमसी) क्षेत्रातील वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी इस्रो या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीसॅट-२० हा उपग्रह स्पेसएक्सच्या फाल्कन-९ या अग्निबाणाद्वारे अवकाशात प्रक्षेपित करणार आहे. 

इस्रोची व्यावसायिक कंपनी असलेल्या न्यूस्पेस इंडिया लिमिटेडने (एनएसआयएल) बुधवारी ही घोषणा केली. जीसॅट-२० या उपग्रहाचे नाव बदलून जीसॅट-एन२ असे ठेवले जाणार आहे. अंदमान-निकोबार, लक्षद्वीपसह संपूर्ण देशात दूरसंचार क्षेत्रातील ब्रॉडबँड व अन्य गोष्टींच्या विस्तारासाठी हा उपग्रह अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. 

इस्रोच्या अवजड उपग्रहांचे जीएसएलव्ही-एमके३ या अग्निबाणाद्वारे प्रक्षेपण केले जाते. मात्र जीसॅट-२० हा ४७०० किलो वजनाच्या उपग्रह फाल्कन-९ या अग्निबाणाद्वारे  अवकाशात झेपावणार आहे. एनएसआयएल व अमेरिकेच्या स्पेसएक्समध्ये झालेल्या करारानुसार हे प्रक्षेपण पार पडेल. भारताच्या ग्रामीण भागामध्ये ब्राॅडबँड सेवा, तसेच मोबाइलचे जाळे विस्तारण्यासाठी जीसॅट-२० उपग्रहाचा उपयोग होणार आहे. 

टॅग्स :Internetइंटरनेटisroइस्रोRural Developmentग्रामीण विकास