आता स्मार्टफोनवर इंटरनेटविना दूरदर्शनची सेवा
By Admin | Updated: April 6, 2016 22:23 IST2016-04-06T22:23:27+5:302016-04-06T22:23:27+5:30
आता तुम्हाला स्मार्टफोनवर दूरदर्शन बघता येणार आहे. दूरदर्शनने स्मार्टफोनवर मोफत टीव्ही सेवांची घोषणा केली आहे. त्यामुळे स्मार्टफोनधारकांना इंटरनेटविना दूरदर्शनच्या वाहिन्या मोफत बघता येतील.

आता स्मार्टफोनवर इंटरनेटविना दूरदर्शनची सेवा
नवी दिल्ली : आता तुम्हाला स्मार्टफोनवर दूरदर्शन बघता येणार आहे. दूरदर्शनने स्मार्टफोनवर मोफत टीव्ही सेवांची घोषणा केली आहे. त्यामुळे स्मार्टफोनधारकांना इंटरनेटविना दूरदर्शनच्या वाहिन्या मोफत बघता येतील. त्यासाठी तुम्हाला डीव्हीबी-टी २ डोंगल वापरण्याची गरज राहील आणि तुमचा मोबाईल ओटीजी(आॅन टू गो) असावा लागेल.
फ्लिपकार्ट, स्नॅपडीलसारख्या ई- रिटेलर कंपन्यांकडून डोंगलची आॅनलाईनची विक्री केली जात आहे. स्मार्टफोनधारकांना त्यासाठी सॉफ्टवेअर डाऊनलोड करता येईल. सध्या दूरदर्शनच्या डीडी नॅशनल, डीडी न्यूज, डीडी भारती, डीडी स्पोर्टस्, डीडी प्रादेशिक/ डीडी किसान या वाहिन्या प्रसारित होतात.
औरंगाबादेतही दिसणार
दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, गुवाहाटी, पाटणा, रांची, कटक, लखनौ, जालंधर, रायपूर, इंदूर, औरंगाबाद, भोपाळ, बेंगळुरू आणि अहमदाबाद या १६ शहरांमधील स्मार्टफोनधारकांसाठी दूरदर्शनची मोफत टीव्ही सेवा उपलब्ध राहील.
(लोकमत न्यूज नेटवर्क)