शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 19:29 IST

पाकिस्तान भारताला वारंवार अणुबॉम्बची धमकी देत असतो. मात्र आता अशी धमकी देण्यापूर्वी तो शंभर वेळा विचार करेल. कारण

पाकिस्तानभारताला वारंवार अणुबॉम्बची धमकी देत असतो. मात्र आता अशी धमकी देण्यापूर्वी तो शंभर वेळा विचार करेल. कारण भारताच्या अण्वस्त्र साठ्यात आता मोठी वाढ झाली आहे. या वर्षी भारताच्या अण्वस्त्रांची संख्या १८० वर पोहोचली आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या नवीन अहवाला दावा करण्यात आला आहे की, अण्वस्त्रांच्या बाबतीत भारत पाकिस्तानपेक्षा आघाडीवर आहे आणि तो हळूहळू अण्वस्त्रे वाहून नेणाऱ्या क्षेपणास्त्रांची संख्या देखील वाढवत आहे.

SIPRI च्या अहवालानुसार, भारत अण्वस्त्रांची संख्या झपाट्याने वाढवत आहे आणि या वर्षी भारताच्या अण्वस्त्रांची संख्या १८० वर पोहोचली आहे, तर गेल्या वर्षीपर्यंत त्याच्याकडे १७२ अण्वस्त्रे होती. गेल्या वर्षी SIPRI चा अहवाल आला होता, त्यात पाकिस्तानकडे १७० अण्वस्त्रे असल्याचा दावा करण्यात आला होता.

या अहवालात म्हणण्यात आले आहे की, भारताचे नवीन 'कॅनिस्टराइज्ड' क्षेपणास्त्रे  अत्यंत सुरक्षित आहेत. या क्षेपणास्त्रां मध्ये आधीच लोड केले जाऊ शकतात. भविष्यात, ही नवीन पिढीची क्षेपणास्त्रे एकाच वेळी अनेक अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम ठरू शकतात.

संबंधित अहवालानुसार, भारत एक नवी न्यूक्लिअर सिस्टिम डेव्हलप करत आहे आणि त्याच्या नव्या कॅनिस्टराइज्ड क्षेपणास्त्रावर ते एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, अनेक वॉरहेड लावले जाऊ शकतात. 

भारताच्या नवीन पिढीतील क्षेपणास्त्र प्रणालींमध्ये अग्नि प्राइम (अग्नि-पी) आणि मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (एमआयआरव्ही) सक्षम अग्नि-५ क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या मते, अग्नि-पी हे अग्नि मालिकेतील क्षेपणास्त्रांचे सर्वात प्रगत व्हेरिअंट आहे. हे एक कॅनिस्टराइज्ड क्षेपणास्त्र आहे, ज्याची रेंज १००० ते २००० किलोमीटर आहे. गेल्या वर्षी भारताने एमआयआरव्ही सक्षम अग्नि-५ ची यशस्वी चाचणी केली. हे ५,००० किलोमीटर अंतरावरूनही लक्ष्यांवर अचूक मारा करू शकते.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान